Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

इस्रायलमध्येही चालणार भारताचा युपीआय पेमेंट

नवी दिल्ली : भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इस्रायलमध्येही सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यात हा करार करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत आणि इस्रायलदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. हा…

समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही- सुनेत्रा पवार

मुंबई : आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी…

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रफुल्ल पटेल…

क्रुरकर्मा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरच्या छळछावण्यात नरसंहार केल्या गेलेल्या लाखो ज्यु समाजाच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘याद वाशेम’ म्हणजेच  जागतिक होलोकॉस्ट स्मृती केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पुष्पचक्र अर्पण करीत सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी इस्त्रालयचे…

 मालमत्ता कर न भरल्यामुळे मुरबाड रोड वरील “ए ॲण्ड जी” हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल

मालमत्ता कर न भरल्यामुळे मुरबाड रोड वरील “ए ॲण्ड जी” हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल डोंबिवली महापालिकेच्या ४/जे प्रभागाची कडक कारवाई. डोंबिवली, दि. २६ फेब्रुवारी – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असलेल्या भारत एम सूचक संचलित “ए ॲण्ड जी” मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा मिळकत क्र. B०२०१२३३८६०१, नुसार हॉस्पिटलने मालमत्ता कराची एकूण पंचाहत्तर लाख, सत्तेचाळीस हजार, पंचवीस रुपये, (७५,४७,०२५)/- एव्हढ्या रक्कमेचा भरणा न केल्यामुळे पालिकेच्या प्रभाग ४/जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व त्यांच्या पथका- कडून हॉस्पीटलची ॲडमीन रुम सिल करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या प्रभागात कर वसुलीची मोहिम अधिकाधीक तीव्र करण्यात येत आहे.  कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर या पुढेही अशी कारवाई केली जाईल.  तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला कराचा भरणा विहित मुदतीत करावा असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे .

आता ‘लाडकी विहीण योजनेची’ सर्वांना आतुरता

आता ‘लाडकी विहीण योजनेची’ सर्वांना आतुरता संपदा सावंत मुंबई: राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सर्वपरिचित असतानाच आता ‘लाडकी विहीण योजना’ नावाने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मात्र ही कोणतीही शासकीय योजना नसून, मराठी रसिकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी आहे. नावात ‘योजना’ असली तरी यामध्ये कोणतीही कागदपत्रे, अटी-शर्ती किंवा शासकीय प्रक्रिया नाही. उलट खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी कुटुंबातील दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण यातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही कलाकृती ताणतणावातून क्षणभर विरंगुळा देणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रंगभूमीवर ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत. “प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकातून पुन्हा रंगभूमीवर परतण्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. अष्टविनायक एंटरटेनमेंट आणि पंचशील एंटरटेनमेंट निर्मित या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी जुळल्यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ प्रेक्षकांना नक्कीच आनंद देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही ‘मनोरंजन योजना’ लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मराठी नाट्यप्रेमींसाठी हसण्याचा नवा डोस घेऊन येत आहे.

नोवेल साळवे यांच्या उपोषणाला कल्याण न्यायालय वकील संघटनेचा पाठींबा

नोवेल साळवे यांच्या उपोषणाला कल्याण न्यायालय वकील संघटनेचा पाठींबा कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील जनतेच्या प्रश्नांसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करणारे नोवेल साळवे यांना कल्याण न्यायालाय वकील संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज आठवा दिवस असुन या आंदोलनाला कल्याण न्यायालाय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश जगताप यांनी त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आझाद मैदान मुंबई येथे येऊन वकील संघटनेच्या वतीने नोवेल साळवे यांना जाहीर पाठिंबा दिले आहे.

 कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा

कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी कल्याण : कल्याण डोंबिवली नोटरी करारावर विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नवीन मालकाच्या नावे हस्तांतरित होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढत असल्याचा मुद्दा पुढे करत भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. नोटरी करारावर अनेक घरे विकली गेल्यानंतरही त्या मालमत्तांचा कर जुन्या मालकाच्या नावावरच राहतो. परिणामी कर वसुलीत अडथळे निर्माण होत असून कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. नोटरी कराराच्या आधारे मालमत्ता विक्री झालेल्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नवीन मालकाच्या नावे कर हस्तांतरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

  पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनाला निर्देश ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्ते साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम व पाडकाम कचऱ्याची प्रक्रिया तसेच ‘स्वच्छ ठाणे व्हिजन’ या उपक्रमाची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर तत्काळ भरल्या जाव्यात, तसेच दरवाज्यांचे कडी-कोयंडे सुस्थितीत ठेवावेत, यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचे महापौरांनी नमूद केले. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात दोन सत्रांत रस्त्यांची साफसफाई केली जाते. यासाठी १६५६ सफाई कर्मचारी कार्यरत असून ६ वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केली जाते. तसेच ओला कचरा प्रकल्प, सुका कचरा प्रकल्प, पूर्वप्रक्रिया केंद्रे आणि बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहितीही यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये व्यापक नियोजन करावे, अशा सूचनाही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या बैठकीत दिल्या.

 महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल

७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६. महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल वडोदरा:- महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राची…