बेस्टकडे स्वतःच्या २४९ बस आहेत
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाची उपकंपनी असलेल्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक बेस्टच्या बसेस शहरातील रस्त्यांवर धावताना आणि सरासरी मुंबईकरांची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या बसेसची संख्या आता केवळ २४९ वर आली…
trendlyne-news
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाची उपकंपनी असलेल्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक बेस्टच्या बसेस शहरातील रस्त्यांवर धावताना आणि सरासरी मुंबईकरांची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या बसेसची संख्या आता केवळ २४९ वर आली…
भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय चेन्नई : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६च्या सुपर ८ फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. प्रथम…
नवी दिल्ली : “आजच्या भारतात शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवणे हा सर्वात मोठा ‘गुन्हा’ बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अशा दिशेने ढकलले जात आहे, जिथे प्रश्न विचारणे हा कट मानला जातो आणि…
नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांचा अजून एक फ्रॉड उघडकीस आला आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात सीबीआयनं आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. शासकीय बँक व्यवहारांमध्ये २ हजार २२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल…
नवी दिल्ली : भारताचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इस्रायलमध्येही सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय इस्रायल दौऱ्यात हा करार करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारत आणि इस्रायलदरम्यान अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. हा…
मुंबई : आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी…
मुंबई : राष्ट्रवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रफुल्ल पटेल…
मालमत्ता कर न भरल्यामुळे मुरबाड रोड वरील “ए ॲण्ड जी” हॉस्पिटलची ॲडमीन रुम सिल डोंबिवली महापालिकेच्या ४/जे प्रभागाची कडक कारवाई. डोंबिवली, दि. २६ फेब्रुवारी – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोडवर असलेल्या भारत एम सूचक संचलित “ए ॲण्ड जी” मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा मिळकत क्र. B०२०१२३३८६०१, नुसार हॉस्पिटलने मालमत्ता कराची एकूण पंचाहत्तर लाख, सत्तेचाळीस हजार, पंचवीस रुपये, (७५,४७,०२५)/- एव्हढ्या रक्कमेचा भरणा न केल्यामुळे पालिकेच्या प्रभाग ४/जे च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले व त्यांच्या पथका- कडून हॉस्पीटलची ॲडमीन रुम सिल करण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या प्रभागात कर वसुलीची मोहिम अधिकाधीक तीव्र करण्यात येत आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर या पुढेही अशी कारवाई केली जाईल. तरी महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपला कराचा भरणा विहित मुदतीत करावा असे आवाहन महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे .
आता ‘लाडकी विहीण योजनेची’ सर्वांना आतुरता संपदा सावंत मुंबई: राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सर्वपरिचित असतानाच आता ‘लाडकी विहीण योजना’ नावाने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मात्र ही कोणतीही शासकीय योजना नसून, मराठी रसिकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी आहे. नावात ‘योजना’ असली तरी यामध्ये कोणतीही कागदपत्रे, अटी-शर्ती किंवा शासकीय प्रक्रिया नाही. उलट खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी कुटुंबातील दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण यातून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही कलाकृती ताणतणावातून क्षणभर विरंगुळा देणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रंगभूमीवर ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत. “प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपटांच्या व्यस्त वेळापत्रकातून पुन्हा रंगभूमीवर परतण्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. अष्टविनायक एंटरटेनमेंट आणि पंचशील एंटरटेनमेंट निर्मित या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी जुळल्यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ प्रेक्षकांना नक्कीच आनंद देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही ‘मनोरंजन योजना’ लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मराठी नाट्यप्रेमींसाठी हसण्याचा नवा डोस घेऊन येत आहे.