Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 महेंद्रशेठ घरत हे दिलेला शब्द पाळणारे नेते!

उरण-पनवेल प्रीमियर लिगच्या आयोजकांचे मत उलवे, ता. २५ : राधेय कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ चिर्ले आयोजित उरण-पनवेल प्रीमिअर स्पर्धेच्या फायनलला रविवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात महेंद्रशेठ घरत आणि गौतमी पाटील यांचे स्वागत केले. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करणारा माणूस आहे. कलाकारांना प्रोत्साहन देणे, हे माझे कर्तव्य मानतो. त्यामुळे चिर्ले येथील तरुण ‘सुखकर्ता’ बंगल्यावर आले होते. त्यांनी माझ्याकडे आमच्या प्रीमियर लिगला आम्ही गौतमी पाटील यांना आणत आहोत. येथील रसिकांना आणि क्रीडाप्रेमींना सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही प्रायोजकत्व स्वीकारावे, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी उरण-पनवेल प्रीमियर लिगचे प्रायोजकत्व स्वीकारले. कलाकारांना प्रोत्साहन आणि स्थानिक तरुणांच्या उदात्त भावना लक्षात घेतल्या. क्रिकेटचा मी नुसता चाहता नाही, स्वतः भरपूर खेळतो.” “महेंद्रशेठ घरत यांनी दिलेला शब्द पाळला. असा शब्दाचा पक्का राजकीय पटलावर एकच नेता आहे तो म्हणजे महेंद्रशेठ घरत,” अशा भावना आयोजकांनी यावेळी व्यक्त केल्या. उरण-पनवेल प्रीमियर लिगचे आयोजक दीपक पाटील, संतोष पाटील आणि त्यांच्या टीमने शाल, सन्मानचिन्ह देऊन महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी हजारो क्रिकेटप्रेमींनी महेंद्रशेठ जिंदाबाद, अशा घोषणांनी क्रिकेट मैदान दणाणून सोडले. यावेळी परिसरातील इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते. ०००००००

एमसीएफ कॅरम स्पर्धा माजी विश्व् विजेता योगेश परदेशी विजयी 

मुंबई: मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशनच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहकार्याने एम सी एफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बोरिवली ( पश्चिम ), येथे संपन्न झालेल्या ११ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याकडून…

ऑसम अंधेरीचे थरारक विजेतेपद

मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा  महिलांमध्ये रणरागिणी क्लबचा दणदणीत विजय मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट्स टर्फवर रंगलेल्या भव्य ‘मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्याने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः खुर्चीच्या टोकावर बसवले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचकारी लढतीत ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबने वियोम फाऊंडेशन इनडोअर क्रिकेट क्लबवर अवघ्या १ धावेने (३३-३२) मात करत विजेतेपद पटकावले. विजयाचा क्षण येताच मैदानावर प्रेक्षकांनी जल्लोष करत उत्सव साजरा केला. याआधी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी (९८-३७) दणदणीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेला सरस्वत बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नितीन दलाल – स्टार सीसी आणि श्री स्वामी समर्थ मेडिकल यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत प्रथमच नाणेफेक गमावल्याने वियोम फाऊंडेशनला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि त्याचा संघाला मोठा फटका बसल्याचे कर्णधार ओमकार पाटोळे यांनी सामन्यानंतर सांगितले. वियोमच्या पहिल्या जोडीतील सिद्धेश घोगरे (५) आणि श्रेयस वैद्य (६) यांनी ११ धावा केल्या. मात्र दिपेनने श्रेयसला बाद करत ५ धावांचा फटका दिला. दुसऱ्या जोडीतील ओमकार पाटोळे (-४) आणि रोहन गावडे (२) यांना मोठी कामगिरी करता आली नाही. ओमकारला आदिलने दोनदा बाद करत वियोमच्या धावसंख्येला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनिकेत माडीये (७) आणि प्रसाद आंब्रे (३) यांनी १० धावांची भर घातली. शेवटच्या जोडीतील शुभम गुरव (५) आणि अजित सेठी (८) यांनी महत्त्वपूर्ण १३ धावा जोडत वियोमला ३२ धावांपर्यंत पोहोचवले. ३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑसम अंधेरीची सुरुवात खराब झाली. मुसा सय्यद (०) आणि मोनू यादव (-४) यांना रोहन गावडेच्या अचूक गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. त्यानंतर संतोष जाधव (०) आणि अहमद (६) यांनी संघर्ष केला, मात्र सतत विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. तिसऱ्या जोडीतील दिपेन दांडेकर (१८) यांनी दमदार खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. शेवटच्या जोडीला विजयासाठी १६ धावांची गरज असताना रोहित खरात (१७) आणि आदिल सय्यद (-१) यांनी जबरदस्त धैर्य दाखवत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. अखेर शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत रोहितने ऑसम अंधेरीला थरारक विजय मिळवून दिला. महिलांच्या अंतिम सामन्यात रणरागिणी इनडोअर क्रिकेट क्लबने एकतर्फी वर्चस्व राखत शक्ती इनडोअर क्रिकेट क्लबवर ६१ धावांनी विजय मिळवला. रणरागिणीकडून नाजूका (२७), प्राजक्ता (२४), प्रिया (११) आणि दृष्टी व पूजा (प्रत्येकी ११) यांनी शानदार फलंदाजी केली. तर शक्तीकडून लावण्या (१३) आणि आचल (११) यांनी झुंजार लढत दिली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (मालिकावीर) म्हणून श्रेयस वैद्य (वियोम फाऊंडेशन) याची निवड करण्यात आली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज : दिपेन दांडेकर (ऑसम अंधेरी) व सर्वोत्कृष्ट गोलंदाज : रोहन गावडे (वियोम फाऊंडेशन) ठरले.   स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेवक यशवंत किल्लेदार व नगरसेवक आकाश पुरोहित यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बाळ वाडवलीकर (माजी क्रीडा अधिकारी, आरसीएफ), विलास पाटील (माजी जनरल व्यवस्थापक, आरसीएफ), संजय चुरी (पीडीजी, लायन्स क्लब ऑफ मुंबई), जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी, वरदा चुरी (कार्याध्यक्षा – पार्क क्लब), दतात्रय वेदक (माजी अध्यक्ष – मुंबई महिला क्रिकेट), विनया तोरसकर (अध्यक्षा – वियोम फाऊंडेशन), संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर व इनडोअर क्रिकेटचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजिंक्य नाईक यांनी, “मुंबईतील सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देणे हेच आमचे ध्येय आहे. क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन कायम पुढाकार घेईल,” असे सांगितले. तर यशवंत किल्लेदार यांनी, “आजची मुले मोबाईल आणि मनोरंजन विश्वात अधिक रमली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मैदानावर आणण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले. विजेत्या ऑसम अंधेरी इनडोअर क्रिकेट क्लबला रु. २५,०००, चषक आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेत्या वियोम फाऊंडेशनला रु. १५,०००, चषक आणि रौप्यपदक प्रदान करण्यात आले. ०००००००

 सीरत, समायरा उप-उपांत्यपूर्व फेरीत

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या आवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १३ वर्षांखालील मुली एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या राऊंड ऑफ ३२ फेरीमध्ये…

‌‘डायरेक्ट सेलिंग‌’ उद्योगाच्या व्यवसायात चार टक्क्यांनी वाढ

भारताच्या ‌‘डायरेक्ट सेलिंग‌’ उद्योगाचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर चार टक्क्यांनी वाढून आतापर्यंतच्या सर्वोच्च 23 हजार 21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्राने एकूण विक्रीत 15.31 टक्के वाट्यासह…

हिमालयाची सावली; त्यागमूर्ती माता रमाई

आज २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव…

जगासमोर हळूहळू एक असे संकट उभे राहत आहे, जिथे तीव्र उष्णता आणि दुष्काळ या दोन वेगळ्या आपत्ती राहिल्या नसून एकत्रितपणे मानवी जीवनावर घातक परिणाम करत आहेत. एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार…

विद्यार्थ्यांचा साकल्याने विचार कधी?

गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाने एक भयंकर प्रश्न समोर आणला आहे. भारतातील विद्यार्थी हे शिक्षणव्यवस्थेचे केंद्र आहेत की व्यवस्थेच्या प्रयोगांचे बळी, असा प्रश्न पडतो. ‌‘नॅशनल टेस्टिंग…

चर्चगेट केंद्राचा विजेतेपदावर कब्जा

३४वी एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा मुंबई : ठाणे केंद्राचा झंझावात पहिल्या डावात १३८ धावांवर रोखल्यानंतर चर्चगेट केंद्राने ७ बाद ३७० धावांचा डोंगर उभा करत पहिल्या डावातील आघाडीच्या…

१ जून ते ३१ जुलैदरम्यान यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारणा अध्यादेश २०२१ च्या अनुषंगाने राज्याच्या सागरी क्षेत्रात यावर्षी १ जून ते ३१…