Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

चिमुकल्यांचा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न हरिभाऊ लाखे नाशिक :स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय पूर्व प्राथमिक, इंदिरानगर येथे ९ एप्रिल रोजी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आनंदात पार पडला.…

लोकसभेत खासदार ५४३ वरून ८१६ होणार

लोकसभेत खासदार ५४३ वरून ८१६ होणार नवी दिल्ली: लोकसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ ते १८ एप्रिल दरम्यान असे तीन दिवस वाढवण्यात आले…

अजित पवारांच्या अपघातादरम्यान खरातच्या बँकेत ६२ वेळा पैसे जमा

अजित पवारांच्या अपघातादरम्यान खरातच्या बँकेत ६२ वेळा पैसे जमा मुंबई : अजित पवारांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६ ला झाला, या घटेनच्या आधी आणि नंतर अशा एकूण पाच दिवसात तब्बल ६२ वेळा विविधवेळा…

मुंबईत दंगेखोरांच्या घरावर बुलडोझर ; 8 जणांना अटक

दंगेखोरांनो खबरदार… दंगा कराल तर यापुढे महाराष्ट्रतही बुलडोजर चालणार… मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर परिसरात काल हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करून दंगल करणाऱ्या ८ दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या बेकायदा बांधकाम आणि…

बौद्धांच्या जात प्रमाणपत्राची फाईल मंत्रालयातून गायब !

बौद्धांच्या जात प्रमाणपत्राची फाईल मंत्रालयातून गायब ! राज्य जन माहिती अधिकाऱ्याची कबुली दिवकर शेजवळ मुंबई : एका उप सचिवाने फक्त बौद्धांसाठी लागू केलेले नमुना क्रमांक : ७ चे नुकसानकारक जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या…

ट्रम्प यांच्या भूमिकांमुळे जग संभ्रमात

ट्रम्प यांच्या भूमिकांमुळे जग संभ्रमात स्थित्यंतर राही भिडे व्हाइट हाऊसच्या मंचावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची येणारी एकामागून एक विधाने आता केवळ राजकीय प्रतिक्रिया राहिलेली नाहीत, तर ती जागतिक अस्थिरतेचे…

युद्धामुळे भारताचीही कोंडी

युद्धामुळे भारताचीही कोंडी युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण होऊ लागले, की किमतींमध्ये अस्थिरता वाढते. कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये तात्काळ प्रतिबिंब दिसून…

बारामतीचे ‘बारामती’ राजकारण सुनेत्रा पवारांनी ‘अर्ज’ भरला शरद पवारांनी ‘शपथ’ घेतली

बारामतीचे ‘बारामती’ राजकारण सुनेत्रा पवारांनी ‘अर्ज’ भरला शरद पवारांनी ‘शपथ’ घेतली स्वाती घोसाळकर बारामती : राज्याच्या राजकारणात बारामतीचे दोन फोटो दिवसभर चर्चेत होते. दिल्लीच्या राज्यसभेत शरद पवारांनी खासदारकीची आज शपथ घेतली तर पवारांच्या बाले किल्ल्यात अजित पवारांच्या निधनाने…

भरदिवसा घराचे कुलूप तोडून लाखोंची चोरी

कल्याण: भरदिवसा घर फोडून चोरीची मोठी घटना डोंबिवली पूर्व परिसरात उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे…

 तबेला मैदान-श्रमिक जिमखाना “हिरक महोत्सवी सोहळा-२०२६

अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई :- वरळी कोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्गचा “हिरक महोत्सवी सोहळा” रविवार, ११ एप्रिल, सायंकाळी ५ ते १० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पूर्वीचे मुंबई व आताच्या मुंबई शहरच्या सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटाच्या संघनायक व संघनायिकेंचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरच्या वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांना देखील यानिमित्ताने गौरविण्यात येईल. मुंबईची कबड्डी वाढविण्यासाठी ज्या संघटनानी सातत्याने स्पर्धा आयोजन केले अशा आर्य सेवा मंडळ(६१वर्ष), शिवनेरी सेवा मंडळ(५३वर्ष), अमर क्रीडा मंडळ, दादर(४३वर्ष)यांच्या बरोबरीने मातीची क्रीडांगण बनविणारे, ते क्रीडांगण एका हाती सरळ रेषेत आखणारा अशोक गुरव आदींचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडून बरोबर महाराष्ट्रात गेली तीन तपे वास्तवास असलेली मोनिका बाकरे(नाथ) हिला देखील निमंत्रित करण्यात आले आहे. कबड्डी सलग चार दशकापेक्षा अधिक काळ खेळणारा विलास जाधव, बंगालला “टायगर” ही उपाधी मिळालेला वसंत सूद, ट्रॉफी बनविणारे हरीश परब, बनियान बनविणारे भुईम्बर आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे. कबड्डीच्या कठीण काळात खेळाडूंना वैद्यकीय सुविधा मिळवून देणारे हाड वैद्य, जेष्ठ पत्रकार, जेष्ठ कबड्डी समीक्षक, सर्वत्र कबड्डी पहाणारे चाहते आदी बरोबर शालेय स्तरापासुन खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदी मान्यवारांना पाचारण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी हिंदमाता सेवा मंडळ, मुंबईत प्रथम जागतिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब, कबड्डीत रोख रकमेची व मोठी पारितोषिके देणाऱ्या संघटनाचा देखील या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या सोहळ्याला क्रीडा प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जेष्ठ्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण निर्माण करावेत. असे आव्हान एका परिपत्रकाद्वारे मंडळाचे अध्यक्ष राणा प्रताप तिवारी यांनी सर्व प्रसार माध्यमा द्वारे केले आहे.