पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सचिन घरत, सचिन राजेंचा पाठपुरावा
राज भंडारी
उलवे :उलवे नोडमधील सेक्टर १५ ते १८ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष येथील रहिवाशांना सतावत आहे. उलवेकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आता उलवेमधील पाणीप्रश्न संपुष्टात येणार असल्याचे अश्वासन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर, सेक्टर १७, उलवे येथे भव्य जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या जनता दरबारास गव्हण ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन घरत तसेच सचिन राजे येरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमधील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जनता दरबारामध्ये महत्त्वाचा विषय उलवे नोडमधील पाणी टंचाई व पाणीपुरवठ्याची समस्या हा होता. यावेळी सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी सेक्टर १५, १६, १७ व १८ येथील रहिवाशांच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर नवीन जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याशिवाय नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी समस्या व अडचणी संयमाने ऐकून घेत, संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. या जनता दरबारास सुमारे ६०० रहिवाशांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांचे समाधान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *