Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

नोवेल साळवे यांच्या उपोषणाला कल्याण न्यायालय वकील संघटनेचा पाठींबा

नोवेल साळवे यांच्या उपोषणाला कल्याण न्यायालय वकील संघटनेचा पाठींबा कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील जनतेच्या प्रश्नांसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करणारे नोवेल साळवे यांना कल्याण न्यायालाय वकील संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज आठवा दिवस असुन या आंदोलनाला कल्याण न्यायालाय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश जगताप यांनी त्यांच्या सहकारी वकिलांसोबत आझाद मैदान मुंबई येथे येऊन वकील संघटनेच्या वतीने नोवेल साळवे यांना जाहीर पाठिंबा दिले आहे.

 कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा

कल्याण डोंबिवलीत नोटरी करारावरील घरांचा कर नवीन मालकाच्या नावे करा भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी कल्याण : कल्याण डोंबिवली नोटरी करारावर विक्री झालेल्या घरांचा मालमत्ता कर नवीन मालकाच्या नावे हस्तांतरित होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढत असल्याचा मुद्दा पुढे करत भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केली आहे. नोटरी करारावर अनेक घरे विकली गेल्यानंतरही त्या मालमत्तांचा कर जुन्या मालकाच्या नावावरच राहतो. परिणामी कर वसुलीत अडथळे निर्माण होत असून कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. नोटरी कराराच्या आधारे मालमत्ता विक्री झालेल्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नवीन मालकाच्या नावे कर हस्तांतरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

  पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनाला निर्देश ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्ते साफसफाई, कचरा हस्तांतरण केंद्र, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्थिती, बांधकाम व पाडकाम कचऱ्याची प्रक्रिया तसेच ‘स्वच्छ ठाणे व्हिजन’ या उपक्रमाची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. शहरातील काही प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे निदर्शनास आणून देत महापौरांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. शौचालयांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असावे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर तत्काळ भरल्या जाव्यात, तसेच दरवाज्यांचे कडी-कोयंडे सुस्थितीत ठेवावेत, यासाठी संबंधित स्वच्छता निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असला तरी झोपडपट्टी भागात हे प्रमाण कमी असल्याचे महापौरांनी नमूद केले. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात दोन सत्रांत रस्त्यांची साफसफाई केली जाते. यासाठी १६५६ सफाई कर्मचारी कार्यरत असून ६ वाहनांच्या माध्यमातून यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता केली जाते. तसेच ओला कचरा प्रकल्प, सुका कचरा प्रकल्प, पूर्वप्रक्रिया केंद्रे आणि बांधकाम व पाडकाम कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेची माहितीही यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांची नियमित साफसफाई करावी आणि सर्व प्रभागांमध्ये व्यापक नियोजन करावे, अशा सूचनाही महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या बैठकीत दिल्या.

 महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल

७२वी वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा, बडोदरा, गुजरात – २०२६. महाराष्ट्र उप उपांत्य फेरीत दाखल वडोदरा:- महाराष्ट्राने “७२व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राची…

 सिद्धांत – मितालीला प्रथम मानांकन

जिल्हा कॅरम स्पर्धा सिद्धांत – मितालीला प्रथम मानांकन मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने पी एम बाथ बोट क्लब ट्रस्ट आयोजित मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा शनिवार दिनांक २८ फेब्रुवारीला सकाळी पुरुष एकेरी गटाने सुरु होत आहे. एकंदर १३० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला असून पुरुष एकेरी गटात डी के से सी च्या सिद्धांत वाडवलकरला तर महिला एकेरी गटात जैन इरिगेशनच्या मिताली पाठकला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी एकंदर सात सत्रात सामने खेळविण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे. पुरुष एकेरी : १) सिद्धांत वाडवलकर ( डी. के.  सी सी ) २) नीरज कांबळे ( डी के सी सी ) ३) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) ४) गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ) ५) हरेश्वर बेतवंशी ( ए के फाऊंडेशन ) ६) सौरभ मते ( डी के सी सी ), ७) शेख महम्मद रझा ( ए के फाऊंडेशन ) ८) नीलांश चिपळूणकर ( ए के फाऊंडेशन ) महिला एकेरी : १) मिताली पथक( जैन इरिगेशन ), २) सोनाली कुमारी ( ए के फाऊंडेशन ), ३) ऐशा साजिद खान ( जैन इरिगेशन ) ४) अंजली सिरीपुरम ( भारतीय आयुर्विमा महामंडळ )

पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ

पुण्यात ALIGN या संरचित रेजोनन्स उपक्रमाचा शुभारंभ पुणे : सजगता -आधारित रेजोनन्स उपक्रम ALIGN चा औपचारिक शुभारंभ रविवारी बाणेर येथील Fitcue Fitness Studio येथे करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागींसाठी ध्वनी -आधारित, संरचित आणि सखोल अनुभव सादर करण्यात आला, ज्याचा उद्देश मज्जासंस्थेचे संतुलन, भावनिक स्थैर्य आणि अंतर्मनातील स्पष्टता वाढवणे हा आहे. प्रिथा देशपांडे आणि डॉ. नेहा साटम यांनी अमोल चाफेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची स्थापना केली आहे. ALIGN ची संकल्पना अशी आहे की ‘अलाइनमेंट’ ही अशी अवस्था आहे, ज्याकडे व्यक्ती जाणीवपूर्वक परत जाऊ शकते. चेतना-विषयक पद्धती आणि मोजता येणाऱ्या आरोग्य-जागरूकतेचा संगम घडवून संरचित आणि सर्वांसाठी उपलब्ध असे व्यासपीठ निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मार्गदर्शित रेजोनन्स-आधारित तसेच इतर उपचारात्मक अनुभवांच्या माध्यमातून व्यक्तींमध्ये संतुलित उपस्थिती, भावनिक समतोल आणि सजग जीवनशैली विकसित करण्याचे ‘ALIGN’चे ध्येय आहे. २०३० पर्यंत २३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत सकारात्मक प्रभाव पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात छोटेखानी समारंभाने झाली. त्यानंतर उपक्रमाच्या कार्यपद्धती आणि तज्ज्ञ टीमची ओळख करून देण्यात आली. विशेष बाब म्हणजे सत्रापूर्वी आणि सत्रानंतर सहभागींचे हृदयगती व ऑक्सिजन पातळी यांसारखे मूलभूत आरोग्य निर्देशांक नोंदवण्यात आले. अनुभवात्मक साधना आणि मोजमापयोग्य निरीक्षण यांचा संगम साधणारी ही रचनाबद्ध कार्यपद्धती ‘ALIGN’ची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरली आहे.

जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ

जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ अशोक गायकवाड नवी मुंबई : विकासाची ध्येय- रणे ठरविण्यासाठी जनगणनेद्वारे प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्वाची असून हे काम काळजीपूर्वक व बिनचूक करावे असे महापालिका…

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची शहापूरात स्थापना ठाणे :  महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ११६०१ अर्थात ४३४० च्या शहापूर तालुका अध्यक्ष पदावर लक्ष्मण महाळुंगे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.तर उपाध्यक्षपदी माधुरी राठोड, सचिव पदावर संजय पोंढेकर,यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्ष महेश बागराव व शशिकांत सपाट, खजिनदार पुनम भेरे,सहसचिव रविंद्र पवार, प्रसिद्धी प्रमुख  निलेश विशे, संपर्क प्रमुख पद्माकर राठोड व विकास मेतकर, सल्लागार रमेश लोभी,चित्रा जगताप व अलका चव्हाण,संघटक सदानंद सोनारे, यांची निवड करण्यात आली.शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.एच.राठोड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनचे जिल्हा अध्यक्ष गजानन विशे तसेच सहायक.प्रशासन अधिकारी अजय भोंडिवले यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली शहापूर पंचायत समितीच्या या नव्या  कार्यकारणीची निवड ही सर्वानुमते करण्यात आली आहे.यावेळी मोठ्या संख्येने पंचायत समिती शहापूरचे कर्मचारी उपस्थित होते.कर्मचा-यांच्या वेतनत्रुटी तसेच पदोन्नती स्तर कमी करणेकरिता जिल्हा तसेच राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा करुन कर्मचाऱ्यांचे हे जिव्हाळयाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष लक्ष्मण महाळुंगे यांनी सांगितले कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.

 सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत एकूण १,००,०००रकमेची पारितोषिके पुणे : युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमेश्वर चषक खुल्या व विविध गटातील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा रविवार, १ मार्च रोजी, गोविंद गार्डन मंगल कार्यालय पाषाण या ठिकाणी होणार आहे. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, “बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून तो विचारशक्ती, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा बौद्धिक व्यासपीठ आहे. आपल्या भागातील लहान मुलांपासून युवा खेळाडूंना स्पर्धात्मक संधी मिळावी आणि त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी, हा ‘सुपर सनी मंथ’ मागील मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील, असा मला विश्वास आहे.” स्पर्धेत एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके, करंडक देण्यात येणार आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असलेली हि स्पर्धा ७,१०,१२,१५ वर्षाखालील व खुल्या गटात पार पडणार आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत विविध वयोगटात मिळून १७० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये ५० रेटेड खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे (९८२२३०३५४०) व दिक्षा गडसिंग(७८३७८३०४०६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषेचे प्राचीनत्व’ (मराठी भाषेच्या जन्मापासून आजवरची स्थित्यंतरे) या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार २७ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेची उत्पत्ती, तिची प्राचीन मुळे, संत साहित्याची परंपरा, शिवकालीन आणि पेशवेकालीन काळातील भाषेची भूमिका, तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेचे बदलते स्वरूप यांचा सखोल आढावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे  आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत.मराठी भाषेचा उगम, तिचे संस्कृत आणि प्राकृत भाषांशी असलेले नाते, विविध शिलालेख आणि ऐतिहासिक दस्तऐवजांतील उल्लेख, तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या साहित्यामुळे भाषेला लाभलेले वैभव यावरही ते प्रकाश टाकणार आहेत. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक आहे, हा संदेश या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे.जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी, साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.