माथेरान : क्रीडा क्षेत्रात मिळणाऱ्या यशाच्या मागे ज्या पाठीराख्यांचे प्रेम आणि सामर्थ्य असते त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रात यश मिळते ही जाणीव ठेवून इंदिरा गांधी नगर येथील विक्रांत क्रिकेट संघाने नुकताच माथेरानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर अन्य भरघोस बक्षिसे प्राप्त केली होती.त्या मिळालेल्या रक्कमेत आपल्याला ज्या पाठीराख्यांमुळे यश मिळाले त्या सर्व इंदिरा गांधी नगर रहिवाशांना एकत्रित करून १३ मार्चला काचवाला बंगला याठिकाणी स्नेहभोजनासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जादूचा खेळ,त्याचप्रमाणे मुलींसाठी आणि महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.प्रथम क्रमांक मोबाईल,मिक्सर, टेबल फॅन, इस्त्री,कुकर अशी विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी जवळपास चारशे पेक्षाही अधिक इंदिरा गांधी नगरचे रहिवाशी आणि गावातील अन्य प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आतिष ढेबे, शैलेश ढेबे, करन जानकर, भावेश झोरे,धनगर समाज अध्यक्ष दीपेश ढेबे,प्रविण बावदाने,रामचंद्र ढेबे, संतोष आखाडे, महिला कार्यकारिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.