मनश्री फाऊंडेशनतर्फे शहीद वीरनारी,वीर माता- पिता यांचा सन्मान
वीरपत्नी शोभा गरंडे यांच्यासह १० शाहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान
ठाणे : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य व मनश्री फाऊंडेशन तर्फे वीरनारींचा वीर माता- पिता यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. देशाचे रक्षण करताना बलिदान शाहिद वीर जवानांच्या कुटुंबाप्रती ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी,अभियंता,कर्मचारी वर्गाने मनश्री फाऊंडेशनच्या वतीने वीरनारींचा वीर माता- पिता यांचा सन्मान सोहळा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. कर्नल वेटरन चटर्जी,ब्रिगेडियर सुधीर सावंत,माजी खासदार हरिभाऊ राठोड,मुंबई महापालिका माजी उपायुक्त लक्ष्मण व्हटकर, एपीजे अब्दुल कलाम यांचे रक्षक राजू पाटील,शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे,समाजसेवक किसान बोन्द्रे,सैनिक फेडरेशन ठाणे अध्यक्ष शोभा गरंडे आदींसह मनश्री फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘जरा याद करो कुर्बानी’ हा कार्यक्रम देखील सदर करण्यात आला. सैनिक वीरपत्नी वीरमाता-पिता व कुटुंबाप्रती ऋण भावना व्यक्त करण्याच्या हेतूने मनश्री फाऊंडेशनचे विश्वस्त मनोहर पवार,अध्यक्षा जयश्री मनोहर पवार,श्री ठोंबरे,तसेच मुंबई महापालिका अधिकारी,अभियंता व महिला कर्मचारी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी देशासाठी ज्यांनी कुर्बानी दिली अशा सैनिक पत्नीचे,देशासाठी ज्यांनी आपलं काळीज दिलं त्या वीरमाता व हृदयात ठेच लागून हि काळीज शांत ठेवणारे निर्भीड वीरपिता यांच्या कुटुंबियांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी वीरनारींचा वीर माता- पिता १० कुटुंबियांना सन्मानचिन्ह,५० हजार रोख असा पुरस्कार देऊन त्यांच्या स्मृतीस कार्यास शौर्यास मानवंदना देण्यात आली.यामध्ये वीर पत्नी शोभा सत्तू गरंडे या वीर पत्नीचा यामध्ये समावेश होता. यावेळी बोलताना वीरपत्नी शोभा गरंडे यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले कि माझा पतीने देशासाठी बलिदान दिले.याचा मला अभिमान वाटतो देशासाठी वेळ पडली तर मी देखील बलिदान देईल असे सांगून भारत मातेच्या घोषणा दिल्या.