माथेरान : गावागावातील पोलीस पाटील हे गावोगावी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात. एखादा घरगुती अथवा गावातील वाद असेल तो स्थानिक पातळीवर सोडवून न्याय देण्याची महत्वपुर्ण भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे पोलीस पाटील हा शासनाने नेमून दिलेल्या शासकीय पदातील एक महत्वपूर्ण जबाबदारी पार करणारा घटक असल्याने शासनाकडून त्यांना जे काही मानधन मिळत होते ते हल्लीच्या महागाईच्या काळात खूपच अपूरे होते त्यासाठी पोलीस पाटलांनी नागपूर येथे आंदोलन केले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढून पोलीस पाटलांचे मानधन ६००० वरून थेट १५००० केले आहे. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची
कर्जत पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *