४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा

ठाणे : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाने सारस्वत बँकेचा १३६ धावांनी दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तस्मय चव्हाण आणि अक्षय माजगावकरच्या अर्धशतकी खेळीमुळे २६९ धावांचे आव्हान उभे केल्यावर ४१ धावा करणाऱ्या आशुतोष घांग्रेने आपल्या भेदक माऱ्याने सारस्वत बँकेला १२३ धावांवर गुंडाळून डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे निर्णायक फेरीतलेस्थान निश्चित केले.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ग्लोबल सर्व्हिसेससाठी खूपच फायदेशीर ठरला. तस्मय चव्हाण आणि अक्षय माजगावकरने दोन अर्धशतकी भागीदारी रचत संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा मोलाचे योगदान दिले. तस्मयने ६५ धावांची खेळी करताना अक्षयसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. तस्मय बाद झाल्यावर अक्षयने जैसवालसह तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी करत संघाच्या धावसंख्येला बळकटी मिळवून दिली. अक्षयने ६५ धावा केल्या. त्यापाठोपाठ आशुतोष घांग्रेने ४१ धावा केल्या.
या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सारस्वत बंकीकडून तेवढ्याच प्रतिकाराची अपेक्षा होती. पण त्यांच्या रणजित नलावडे आणि सलील सामंतचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला आशुतोषच्या प्रभावी माऱ्यापुढे तग धरता आला नाही. रणजितने संघासाठी सर्वाधिक २३ आणि सल्ल्याने १५ धाव केल्या. आशुतोषने एका निर्धाव षटकासह ११ धावांत ५ बळी मिळवले. केतन खरातने २ गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस : ३५ षटकात ६ बाद २६९ ( तस्मय चव्हाण ६५,अक्षय माजगावकर ६५, आशुतोष घांग्रे ४१, राजेश साबळे ६-४६-२, नितेश पवार ४-२९-१, संकेत कदम ७-६२-१ , रणजित नलावडे ३-२६-१, समीर भोईटे ३-३२-१ ) विजयी विरुद्ध सारस्वत बँक : ३३.१ षटकात सर्वबाद १२३ ( रणजित नलावडे २३.
सलील सामंत १५, आशुतोष घांग्रे ६.१-१-११-५, केतन खरात ७-३-१४-२, किरण देसाई ७-१-३७-१, हर्ष भोईर ५-१-१२-१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *