राजीव चंदने
मुरबाड : नुकताच लोकसभेच्या निवडणुका जाहिर होताच भारतीय जनता पार्टी कडून खासदार कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यादां उमेदवारी मिळाल्या नंतर मुरबाड शहरातील माऊली गार्डन येथे भारतीय जनता पार्टी मुरबाड विधानसभा मतदार संघातील मुरबाड ग्रामीण व शहर सुपर वोरीयर्स,शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख आणि भाजप पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते, त्यावेळी बोलतांना खासदार कपिल पाटील म्हणाले की कोण म्हणतो मुरबाड रेल्वेचा प्रस्ताव मंजूर झाले नाही त्याला माझ्या समोर आणा, बोलणाऱ्याचं तोंड धरता येणार नाही त्यानां बोलू द्या,मोदींच्या आशीर्वादाने येत्या सहा महिन्यात मुरबाडला रेल्वेच काम सुरु होणारचं, त्यामुळे कोणाच्याहि भुलथापाला बळी पडू नका, काही तांत्रिक अडचणीमुळे मुरबाड रेल्वेच काम रखडले आहे. केंद्रशासनाने आणि राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे परंतु रेल्वे साठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यानां योग्य तो मोबदला न मिळाल्याने ते नाराज असून त्त्यांच्या समस्याचा निवारण करूनचं शेतकऱयांना योग्य तो मोबदला दिला जाईल, आणि पुढे रेल्वेचं काम सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल,नरेंद्र मोदी हे देशाचे उस्ताद आहेत त्याचें डाव पेच कोणाला हि माहित नाही असे हि प्रतिपादन केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांनी यावेळी केले ,मंत्री महोदय पुढे म्हणाले की मीं आगरी समाजाचा आहे म्हणून मला मते देऊ नका तर विकासाला मतदान करा कारण माझ्याकडे जात भेद चालत नाही,आता मतदारांनी योग्य तो निर्णय घेऊन उपस्थित प्रत्येक बूथ प्रमुखांनी 490 मतदान तरी मते काढले पाहिजे तरच आपला सर्वाधिक मतांनी विजय निश्चित होईल, त्यामुळे सर्व कार्यकर्तेनीं आपकी बार 1लाख पार असे ब्रीद वाक्य आपापल्या व्हाट्सअप वर स्टेटस ठेवण्याचे आदेश हि यावेळी त्यानीं दिले आहे,त्याप्रसंगी मुरबाड साजई गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी सरपंच लहू गायकर, शंकर गायकर व महिला यांनी पक्ष प्रवेश केला त्यावेळी भाजपचे युवा नेतृत्व हरेश खापरे, भाजप तालुका अध्यक्ष, जयवंत सूर्यराव, सरचिटणीस नितीन मोहपे,जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, जेष्ठ नेते सुभाष आप्पा घरत, लियाखत शेख, माजी नगराध्यक्ष किसन कथोरे, महिला आघाडीचे शीतल तोंडलीकर,माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी दिपक खाटेघरे, महेंद्र पवार सर,आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.