नवी दिल्ली : भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच समावेश नाही.
भाजपने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत देशभारीतल वेगवेगळ्या 195 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. यात सध्या मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या 34 मंत्र्यांचा समावेश होता. भाजपने आपल्या पहिल्या यादीत एकूण 28 महिला नेत्यांनाही तिकीट दिलेले आहे.
भाजपाच्या दुसऱ्या यादीत एकूण 72 उमेदवारांची नावे होते. यामध्ये नितीन गडकरी यांच्यासह, पीयुष गोयल, अनुगार ठाकूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल ठक्कर, रविंद्रसिंह रावत, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा समावेश होता.
तिसऱ्या यादीत कोणाचा समावेश?
भाजपच्या या तिसऱ्या यादीत एकूण 9 जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या सर्व जागा या तमिळनाडू राज्यातील आहेत. यामध्ये तमिळनाडूचे भाजपचे नेते तथा माजी आयएएस अधिकारी के. अण्णामलाई यांच्या नावाचा समावेश आहे. ते कोईंबतूर येथून निवडणूक लढवणार आहेत.