१९वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

मनाली रत्नोजी, ऋतिका गायकवाड यांना रौप्यपदक

हरयाणा : पंचकुला, हरयाणा येथे सुरु झालेल्या १९व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत गत स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणा-या महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदक पटकावताना पहिला दिवस गाजवला.

पहिल्या दिवशी सर्व वयोगटातील एक्ससीटी (क्रॉस कंट्री टाईम ट्रायल) प्रकारामधील स्पर्धा संपन्न झाल्या. सब ज्युनिअर बॉईज या वयोगटात नाशिकच्या योगेश सोनावने याने ५१ मि. ४१.२४५से अशी विक्रमी वेळ देत या स्पर्धेतील महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला. तब्बल पाच मिनीटे उशिराने स्पर्धा संपवनारा पश्चिम बंगालचा सत्यदिप सुनामने ५६ मि ५३.२५१ से. वेळ देत रौप्यपदक तर हिमाचल प्रदेशच्या युगल ठाकुरने ५७ मि. ३१.११४ से वेळेसह कांस्यपदक मिळवले.

वुमेन ज्युनिअर वयोगटात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखले. चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची आंतरराट्रीय सायकलपट्टू सिद्धी शिर्के हिने या वयोगटात ४९ मि १३.४६४ से वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसनी घातली तर महाराष्ट्राचीच पुण्याची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू मनाली रत्नोजी हिने ५० मि. ०६.१८९ से. वेळ नोंदवत रौप्यपदकावर आपले नांव कोरले. कर्नाटकची करेन मार्शलने ५९ मि. ३०.४९४ से. नोंदवताना या गटातील कांस्यपदक मिळवले.

नाशिकचीच  आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू ऋतिका गायकवाड हिने वुमेन ईलीट वयोगटात १ ता. ११ मि. ४७.३६३ से. वेळ देताना रौप्यपदक मिळवले, या वयोगटात कर्नाटकच्या स्टार नारझरी हिने १ ता. १० मि २९.९९३ से वेळ देत सुवर्णपदक पटकावले तर मध्य प्रदेशच्या संध्या मोर्य हिने १ ता १४ मि ४५.६८९ से वेळ देत कांस्य पदक मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *