Month: March 2024

योगेश सोनावने, सिद्धि शिर्के यांनी सुवर्णपदक

१९वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा मनाली रत्नोजी, ऋतिका गायकवाड यांना रौप्यपदक हरयाणा : पंचकुला, हरयाणा येथे सुरु झालेल्या १९व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत गत स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणा-या महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदक पटकावताना पहिला दिवस गाजवला. पहिल्या दिवशी सर्व वयोगटातील एक्ससीटी (क्रॉस कंट्री टाईम ट्रायल) प्रकारामधील स्पर्धा संपन्न झाल्या. सब ज्युनिअर बॉईज या वयोगटात नाशिकच्या योगेश सोनावने याने ५१ मि. ४१.२४५से अशी विक्रमी वेळ देत या स्पर्धेतील महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला. तब्बल पाच मिनीटे उशिराने स्पर्धा संपवनारा पश्चिम बंगालचा सत्यदिप सुनामने ५६ मि ५३.२५१ से. वेळ देत रौप्यपदक तर हिमाचल प्रदेशच्या युगल ठाकुरने ५७ मि. ३१.११४ से वेळेसह कांस्यपदक मिळवले. वुमेन ज्युनिअर वयोगटात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखले. चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची आंतरराट्रीय सायकलपट्टू सिद्धी शिर्के हिने या वयोगटात ४९ मि १३.४६४ से वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसनी घातली तर महाराष्ट्राचीच पुण्याची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू मनाली रत्नोजी हिने ५० मि. ०६.१८९ से. वेळ नोंदवत रौप्यपदकावर आपले नांव कोरले. कर्नाटकची करेन मार्शलने ५९ मि. ३०.४९४ से. नोंदवताना या गटातील कांस्यपदक मिळवले. नाशिकचीच  आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू ऋतिका गायकवाड हिने वुमेन ईलीट वयोगटात १ ता. ११ मि. ४७.३६३ से. वेळ देताना रौप्यपदक मिळवले, या वयोगटात कर्नाटकच्या स्टार नारझरी हिने १ ता. १० मि २९.९९३ से वेळ देत सुवर्णपदक पटकावले तर मध्य प्रदेशच्या संध्या मोर्य हिने १ ता १४ मि ४५.६८९ से वेळ देत कांस्य पदक मिळवले.

उल्हासनगरमध्ये तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण गोशाळा

उल्हासनगर : उल्हासनगर येथील स्वामी शांतीप्रकाश आश्रमात गोशाळा हे भाविकांसाठी अनेक वर्षांपासून श्रद्धेची ठिकाण असून आता ही गोशाळा तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण बनविली जात आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणारी ही ठाणे जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोशाळा असल्याची माहिती स्वामी देवप्रकाश महाराज यांनी दिली. स्वामी शांतीप्रकाश आश्रमातील राधेश्याम गोशाळेत स्वामी देवप्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर- 5 येथील स्वामी शांतीप्रकाश मंदिरात बांधलेल्या गोशाळेत अनेक वर्षांपासून 1700 गायींची सेवा केली जात असून गायी सोबतच कबुतर, पक्षी देखील आहेत. तेथे सेवा दिली जाते. सामान्य दिवशी कोणीही व्यक्ती पवित्र वातावरणात असलेल्या गोठ्यात जाऊन गाईंना गवत, केळी इत्यादी खायला घालू शकते. तेथे गवत, केळी, भाज्या इत्यादींची विशेष स्वच्छता केली जाते आणि विशेष पौष्टिक आहारही दिला जातो. गाई नेहमीच्या नित्यक्रमानुसार, गायींसाठी येथे आयोडीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून ही गोशाळा अत्याधुनिक पद्धतीने बनविली जात असून गाईच्या सेवेसाठी लागणारे गवत किंवा खाद्यपदार्थ सहज पोहोचवण्यासाठी ट्रॉली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गोरक्षण आणि उपचारासाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात  मजबूत आघाडी उभी करणार !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध…

कधी ना कधी भाजपचे सरकार जाणार

राहुल गांधींनी दिला कठोर कारवाईचा इशारा नवी दिल्ली : आयकर विभागाने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सुमारे 1800 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. ही नोटीस…

केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्लीत ‘इंडीया’ रणशिंग फुंकणार

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेते असलेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याने आम आदमी पक्षाकडून या अटकेविरोधात देशभरात आंदोलनं करून ईडी आणि केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. आता विरोधी…

एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

उरण : शासनाने अटल सेतू प्रभावित क्षेत्रातील उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांत नवनगर (तिसरी मुंबई) उभी करण्यासाठी एमएमआरडीएला नवे नगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा…

कामा रुग्णालयात नऊ नवे विभाग सुरू होणार

मुंबईनजीकच्या रुग्णांना दिलासा मिळणार मुंबई : जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कामा रुग्णालय संलग्नित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कामा रुग्णालयामध्ये लवकरच नऊ नवीन विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

काँग्रेसल प्राप्तिकर विभागाची १,८२३ कोटींची नोटीस

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची चार बँक खाती काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आली आहेत त्यानंतर आज प्राप्तिकर विभागाकडून १,८२३ कोटींचा कर भरण्याची नोटीस देण्यात आली. यानंतर काँग्रेसचे खजिनदार अजय माकन…

सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर ट्रॅफीक जाम

लोणावळा : गुड फ्रायडेला जोडून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ट्रॅफीक जाम झाले. घाट क्षेत्रात वाहतूक संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलिसांनी प्रयत्न…