प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा
पनवेल : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट यांच्यामार्फत प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाने अद्वितीय अशी कामगिरी बजावली. यामध्ये एकूण 157 किलोग्रॅमवेस्ट प्लास्टिक जमा करून शाळेने एक उच्चांक प्रस्थापित केला आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांचा मंगळवारी सत्कार केला.
ही स्पर्धा इंडियन ऑइल एस पी एल ओ पी एल गेल इंडिया लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे रायगड जिल्हा आणि नवी मुंबई शाळांसाठी प्रायोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल 26 फेब्रुवारी 2024 ला जाहीर करण्यात आला होता. त्यानिमित्ताने 1 एप्रिल 2024 सोमवार रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अद्वितीय कामगिरी बजावल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचा पालक वर्ग शिक्षक वर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, इनचार्ज टीचर निकिता मॅडम आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांनी उत्स्फूर्तपणे प्लास्टिक रिसायकलिंग चे महत्व पालकांना पटवून देत घराघरातून रिसायकलेबल प्लास्टिक जमा करून शाळेत आणले तसेच ठिकठिकाणी फेकून दिल्या जाणाऱ्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांनी सर्वांना समजून सांगितली.