जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी जाहीर

नवी दिल्ली- महिलांना वर्षाला एक लाख रुपयांची मदत देण्याची गॅरंटी देणारा निवडणूक जाहीरनामा आज काँग्रेसने प्रसिध्द केला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

काँग्रेसचे ग्यान!

काँग्रेसने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा ‘ग्यान’ (GYAN) या संकल्पनेवर अधारीत प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये जी(G)- गरीब, वाय(Y)- युवा, ए (A)- अन्नदाता, एन (N)- नारी, अशी काँग्रेसची संकल्पना आहे.

काँग्रेसची गॅरंटी

तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देणार
आरक्षणाची मर्यादा वाढवविणार
सरकारी नोकऱ्यांमधील कत्रांटी धोरण रद्द करणार

विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये, म्हणून कायदा केला जाणार.
गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार.
शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपी लागू करणार.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास एका महिन्यात मदत मिळणार.
शेतकऱ्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविणार.
असंघटित कामगारांसाठी दुर्घटना वीमा योजना आणणार.
बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये चांगले पैसे थेट खात्यात देणार
अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबवविणार पेपरफुटीचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य निर्णय घेणार.
गॅस सिलिंडरच्या दरात कपात करणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यूयॉर्क, थायलंडचे फोटो

भाजपाकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्यात आली. जाहीरनाम्यात न्यूयॉर्क आणि थायलंड देशातील फोटो छापण्यात आले आहेत, यावरून काँग्रेस किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी दिली.

सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, “मध्यंतरी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख म्हणाल्या की, त्यांचे सोशल मीडिया कोण हाताळते? हे त्यांना माहीत नाही. पण पक्षाचा जाहीरनामा कोण तयार करते, हे तरी पक्षाला माहीत असावे ना. जाहीरनाम्यात पर्यावरण विभागात जे फोटो छापले गेले आहेत, ते राहुल गांधींच्या आवडत्या देशाचे आहे. थायलंड हा देश राहुल गांधींचा आवडता देश आहे.”अशी खोचक टीकाही त्रिवेदी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *