२० मेला आपल्याकडे मतदान आहे ४० ते ४२ दिवसच आता आपल्या हातात उरलेले आहेत. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांनी देशातील महिलांसाठी महिला धोरण आणले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील चौथे महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. षुरुषांना प्रचार करताना मर्याद येतात पण महिला थेट कीचनपर्यंत जातील यामुळे जेवढ्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना गेल्या १० वर्षातील माननीय नरेंद्र मोदीसाहेबांनी देशहितासाठी घेतलेले निर्णय माहित पाहिजेत, बोलता आले पाहिजेत, ते लोकांना कनविन्स् करता आले पाहिजेत , त्याची उजळणी लोकांना करुन देता आली पाहिजे. ही सगळी जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांची आहे.जय श्रीराम प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे, जगाच्या कणाकणामध्ये आहे. पण निवडणूक एक वेगळे विज्ञान आहे हे समजून आपल्या पदाधिकाऱ्यांनी पुढील ४० दिवसात नेमक काय केल पाहिजे, हे आपण ठरवले पाहिजे. जाहिरसभा होत राहतील, मेळावे होत राहतील पण लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात. लोकांनी महायुतीला मतदान कसे करावे, हे तुम्ही कसे कन्विन्स करणार आहात. घोडबंदर रोडचा संपूर्ण पट्टा, म्हणजे १४६ ची डावी बाजु व १४८ ची उजवी बाजु ही काॅस्मोपाॅलिटन आहे. त्यामुळे आपल्या पदाधिकाऱ्यांना मराठी हिंदीसह इंग्लिश चाही उपयोग करायला हवा. मराठी जशी माझी आई आहे, हिंदी जशी माझी मावशी आहे तर इंग्लिश ही युनिवर्सल लँग्वेज आहे. त्यामुळे इंग्लिश मध्ये थोडफार बोलता आले पाहिजे, हिरानंदानी इस्टेट, मेडोस, विजयनगरी आदी ठिकाणी उमेदवाराच्या जेव्हा प्रचाराला जाल तेव्हा त्या मॅनेजिंग कमिटीशी देखील बोलता आले पाहिजे. त्यामुळै कार्यकर्त्याची देखील तयारी पूर्ण झाली पाहिजे. नरेंद्र मोदीसाहेबांनी मागच्या १० वर्षातील केलेली केंद्रातील लोकहिताची कामे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या हितासाठी घेतलेले निर्णय हे आपल्याला माहिती पाहिजे. ५ ट्रिलिअन इकाॅनाॅमी म्हणजे काय ? जीडीपी म्हणजे काय ? बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे काय ? मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक आणून जी मुक्ती दिली हे काय ? या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलता आल्या पाहिजेत. प्रवासाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, उद्योगाच्या ठिकाणी आपल्याला बोलता आले पाहिजे. मात्र टू माऊथ पब्लिसिटी कार्यकर्त्याला करताच आली पाहिजे. यामुळे येत्ता ४० दिवसात काय केले पाहिजे हे नेतागण सांगतीलच. उमेदवार कोण याची काळजी करु नका, आपले उमेदवार एकच माननीय नरेंद्र मोदीसाहेब. यामुळे एनडीए ने नारा दिला आहे.अबकी बार ४०० पार, आणि राज्यामध्ये महायुतीचा ४५ प्लसचा नारा हाच संकल्प घेऊन आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागायचे आहे. माझी एक सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की रोज निवडणुकीचे काम हे केलच पाहिजे, आता ही वेळ आहे आपापल्या पक्षासाठी वेळ देण्याची, ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.
