ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने ९९ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७१ वी राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा रविवारी, ५ ते गुरुवारी ९ मे २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. २,५०,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
विजेता, उपविजेत्याउपविजेत्या आणि उप उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या संघाना रोख रकमेची पारितोषिके, चषक देऊन गौरवण्यात येईल. तसेच विजेत्या संघाला ₹ ४४,४४४/-, उपविजेता : ₹ ३३,३३३/- आणि उप उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना ₹ ११,१११/- रोख रकमेची पारितोषिके देण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ₹ ५,०००/- चा मानकरी ठरेल. तसेच सर्वोत्तम चढाईपटू आणि पक्कडपटू यांना प्रत्येकी ₹ ३,०००/- चे पारितोषिक मिळेल. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट चढाईपटू व पक्कडपटूला ₹ १,०००/- प्रत्येकी बक्षिस रक्कम रोख मिळेल. स्पर्धेचे प्रवेश अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे), महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कार्यालय (दादर), मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन कार्यालय (कुर्ला) व मुंबई शहर कबड्डी असोसिएशन कार्यालय, (वडाळा) येथे उपलब्ध आहेत. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे सोमवार, दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत स्विकारले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *