ठाणे : चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीची स्थापना करून आरती नंतर संतोष चौधरी प्रस्तुत “दादुस आला रे” या कोळीगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचे दर्शन करून या कोळीगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्ती ठाण्यातील श्री. मनीष लीला चंद्रकांत वैती, श्री. दिलीप वसंत नाखवा, श्री. संदीप प्रभाकर कोळी, आनंदिता कुणाल कोळी, चैताली सुरेश नाखवा, डॉ. अंकित संतोष कोळी, सौ. शर्मिला दिनेश पाटील, सौ. करिष्मा केविन कोळी- नाखवा, श्री. अनंत पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी असलेल्या दादुस यांना सन्मानित केले.
