मुंबई : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता भारतीय रेल्वेतर्फे ‘सुपर ॲप’ लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या अॅपची गरज नसणार आहे. आता एकाच अॅपवर सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय.
प्रत्येक समस्येसाठी स्वतंत्र अॅप असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र, आता एकच सुपर अॅप येणार असल्यानं प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं अडचणी कमी होणार आहेत. या अॅपमध्ये एकाचे वेळी तुम्हाला तिकीटही बुंकींग करता येणार आहे आणि ट्रेन ट्रॅकिंगसारख्या गोष्टी करता येणार आहेत. तसेच एखाद्या प्रवाशाला जर काढलेलं तिकीट रद्द करायचे असेल तर ती देखील सुविधा अधिक गतीमान करण्यात आलीय. फक्त 24 तासात तुम्हाला तुमचे पैस रिफंड होतील.
भारतीय रेल्वेचे IRCTC Rail Connect हे अॅप सर्वात लोकप्रिय
दरम्यान, भारतीय रेल्वेचे IRCTC Rail Connect हे अॅप सर्वात लोकप्रिय अॅप आहे. जवळपास 10 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. याचबरोबर Rail Madad, UTS, Satark, TMS Nirikshan, IRCTC एअर आणि पोर्ट रीड यासारखी इतर अनेक ॲप्स देखील कार्यरत आहेत. मात्र, आता प्रवाशांना वेगवेगळी अॅप वापरावी लागणार नाहीत रेल्वेच्या नवीन सुपर अॅपमध्ये सर्व माहिती मिळेल.