कर्जत : भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले.
कर्जत उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात बुधवार, (दि.१० एप्रिल २०२४) रोजी भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला आहे. मोजणी साहित्य पूजन करणेत आले व यामध्ये प्लेन टेबल, ईटीएस मशीन, आत्याधुनिक रोवर मशीन इ. साहित्य पूजन करणेत आले. लोकांना, व शेतकरी यांना मोजणी साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. याप्रसंगी मुख्यालय सहाय्यक श्रीमती उज्वला अहिरे, शिरस्तेदार शैलेश जाधव, निमतानदार नंदकिशोर कोळी, छाननि लिपिक निलेश हराळ, भूकरमापक दत्तात्रय पाटील, कृष्णा गायकवाड,
ऋषिकेश नाईक, यश जाधव, अण्णासाहेब सोमवशी, संजय गायकवाड, श्रीमती स्मिता भोसले , दुरुस्ती लिपिक दत्तात्रय कदम, कनिष्ठ लिपिक अश्विनी पोळ, नगर भूमापन लिपिक अपेक्षा भोईर, दप्तरबंद अविनाश पडवळ व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. भूमि अभिलेख विभागाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. १० एप्रिल १८०२ रोजी त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात ब्रिटिश काळात झालेली होती. कारण तेव्हापासून १० एप्रिल भूमापन दिन म्हणून ओळखला जातो. शासनाने कर्जत कार्यालयास पहिल्या ३ व आता ५ रोवर मशीन पुरविले असून आता सर्व मोजणी कामकाज रोवर मशीनद्वारे होणार असून अत्यंत अचूक व गतीमान कामकाज होणार आहे. तसेच लवकरच कर्जत कार्यालयात ई मोजनी व्हर्जन-२ प्रणाली लागू होणार आहे. त्यात जनतेला आपला मोजणी अर्ज आपल्या घरून मोबाईलवरुन सुद्धा मोजणी अर्ज दाखल करता येणार असून ‘क’ प्रत सुद्धा अर्जदार यांना ई-मेलवर मिळणार आहे. याबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई जयंत निकम यांनी व्हर्जन-२ बाबत सतत आढावा घेवून तात्काळ ते जनतेला वापरासाठी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांनी मार्गदर्शन केले आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे यांनीही मार्गदर्शन करीत शंकांचे निरसन केले.