ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी, उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.
मुख्यालयात अभिवादन
दरम्यान, ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
तसेच, महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद काबंळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते.
