ठाणे- रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार सुधागड तालुक्यातील कासारवाडी, नवघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते. यावेळी कासारवाडी, जाधववाडी, नवघर, आसरे, फळसुंडे, धोंडिवली, नवघर बौध्दवाडी, आसरे बौद्धवाडी, उंबरवाडी आदिवासी वाडी गावातील सुमारे 208 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेेतला. 208 रुग्णांपैकी 7 रुग्ण विविध आजारांनी ग्रस्त आढळले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी ठाण्यात डॉ. बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत.
सन 2000 सालापासून सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीकडून सेक्रेटरी अमित देशपांडे, युवा व्यवस्थापक मोहन तेलंग, माजी अध्यक्ष संग्राम जोशी, अर्चना जोशी, ठाणे शहरातील नावाजलेले शल्य विशारद व सुधागड भूषण डॉक्टर श्रीपाद बोडस, डॉ. नीता पाटील व रोटरॅक्ट आणि इंट्रॅक्टर्स यांची टीम, व मेडिकल सर्जिकल नर्सेस सोसायटीमधून प्रिया शिंदे, बाबा कराळे, प्रिया तळगावकर आदींच्या टीमने लहान मुले मुली, तरुण मुले, मुली, महिला व पुरुष, ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ पुरुष यांची आरोग्य तपासणी करून विनामूल्य औषध उपचार करण्यात आले. संग्राम जोशी यांनी रुग्णांना विनामुल्य औषधे उपलब्ध केली. तसेच या शिबिरासाठी प्रकल्प समन्वयक सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ, ठाणे समन्वयक बळीराम निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत लहाने, प्रचार व प्रसार कमिटी राजेश बामणे, अजय जाधव, भगवान तेलंगे, दत्ता सागळे, जाधववाडी गावचे दिनेश जाधव, कासारवाडी गावचे राजेश मांगले तसेच विशेष सहयोग कासारवाडी, जाधववाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, सह्याद्री मित्र मंडळ, कासारवाडी, प्राथमिक रा.जि.प. शाळा कासारवाडी आदींचे सहकार्य लाभले.