अनिल ठाणेकर
ठाणे : कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथे आयोजित कळवा, मुंब्रा आणि दिवा येथील भाजपच्या सुपर वॉरीअर्सच्या आढावा बैठकीला खासदार डाॅ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी यंदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ही टक्केवारी वाढविणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना राज्य समन्वयक, प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपचे कल्याण लोकसभा अध्यक्ष शशिकांत कांबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, युवामोर्चा प्रदेश सचिव मिहीर देसाई, ठाणे सरचिटणीस डॉ. समीरा भारती यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.