ईशान्य मुंबईतुन भाजपा तडीपार..!
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात ईशान्य मुंबई लोकसभेच्या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई जगतापजी,शिवसेना उपनेते सचिनजी आहिर, दत्ताजी दळवी, नसीम खानजी, जेष्ठ कॉंग्रेस नेते व मा.आमदार विरेंद्र बक्षी साहेब, चरणसिंग सप्राजी, राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव, आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेननजी, पिपल रिपब्लिकन पक्षाचे मिलिंद सुर्वेजी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीच्या वक्त्यांनी महागाई, जुमलेबाजी, हुकुमशाही, संविधान या प्रमुख विषयांवर भाषणातुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच हि सुवर्ण संधी असुन आपण सारे देशभक्त इंडिया म्हणुन लढत आहोत, मशाल हे चिन्ह घरोघरी पोहचवुन संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतुन दिल्लीत पाठवुया असा निर्धार यावेळी सर्वांनी केला.
माझ्यासह आमदार तथा विभाग प्रमुख रमेशजी कोरगांवकर, विभागप्रमुख सुरेशजी पाटील, आमदार सुनिलजी राऊत, म. विभाग संघटक राजराजेश्वरी रेडकरजी, प्रज्ञा सकपाळजी, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
