मुंबई : उन्हाळी सुट्टयांमुळे मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेन क्रमांक ०१०८३लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष ट्रेन शनिवारी २० एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:५० वाजता एलटीटी येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक ०१०८४ उन्हाळी विशेष गाडी सोमवारी २२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०८५ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक ०१०८६ विशेष गाडी मंगळवारी २३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०८१ एलटीटी -दानापुर विशेष गाडी रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता दानापुर येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक ०१०८२ विशेष गाडी सोमवारी २२ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता दानापुर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या तिन्ही गाड्यांचे आरक्षण १९ एप्रिल २०२४ रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु होणार आहे.
