जुना माल पडून असल्याने कोट्यवधीचे नुकसान

मुंबई: राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये पडलेली फुट त्या पक्षांसाठी नव्हे तर निवडणूक प्रचार साहित्याच्या बाजारावरही पडला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे प्रचार साहित्य विक्रेत्यांना कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागत आहे. दोन्ही पक्ष एकसंध असताना तयार केलेले प्रचार साहित्य आता फेकुन देण्याशिवाय या विक्रेत्यांकडे पर्याय उरलेला नाही.त्यामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून ऑर्डर आल्याशिवाय माल बोलावला जात नाही.

प्रचार साहित्याचा सर्वाधिक मोठा बाजार म्हणून मुंबईतील लालबागच्या बाजाराची ओळख आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजपस ,मनसे आणि इतर पक्षांचे चिन्हे असलेल्या टी- शर्ट,टोपी, बिले, दुपट्टा, झेंडे आणि इतर प्रचार साहित्याची मागणी निवडणुकीच्या काळात मोठी मागणी असते.निवडणुकीनंतर न विक्री झालेले प्रचार साहित्य विक्रेत्यांकडे तसेच पडून असते. पुढे महानगरपालिका, विधानसभा आणि इतर निवडणुकीत त्याची विक्री केली जाते.

मात्र यंदा दोनाचे चार पक्ष झाले. एकनाथ शिंदे यांच्याकडे मूळ शिवसेना पक्ष गेला तर उध्दव ठाकरे यांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागला. मात्र जुन्या प्रचार साहित्यामध्ये टी शर्ट, दुप्पटासही इतर प्रचार साहित्यावर धनुष्य बाण आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे हे जुने प्रचार साहित्य यावेळी वापरता येणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे हाच त्रास सहन करावा लागत आहे. घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे गेले आहे. तर शरद पवारांकडे तुतारी चिन्ह आले आहे. त्यामुळे आधी तयार केलेल्या साहित्य आता फेकून द्यावे लागणार आहे. हे प्रचार साहित्याची किंमत काही कोटी रुपये होती.

सावधगिरीची भूमिका

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीमुळे जे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा प्रचार साहित्य व्यावसायिकांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे.यंदा तुतारी आणि मशाल हे नवे चिन्ह आहे.त्यामुळे पक्षाकडून ऑर्डर आल्याशिवाय साहित्य निर्मीती न करण्याचा निर्णय या विक्रेत्यांनी घेतला आहे.

नव्या पक्षांचे प्रचार साहित्याचे नमुने तयार करुन ठेवले आहे. जसे जसे ऑर्डर येतात त्या पध्दतीने आम्ही प्रचार साहित्य तयार करतो. यामुळे आमचे नुकसान कमी होईल. लालबागमधील प्रचार साहित्याच्या व्यावसायिकांनी  बोलताना ही माहिती दिली आहे.

सुरतवरुन येतो माल

आशिया खंडातील सर्वात मोठा कापड बाजार म्हणून गुजरातमधील सुरत शहराची ओळख आहे. सर्व देशात सुरत आणि दिल्लीवरुन प्रचार साहित्य मागवले जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांची निवडणूक चिन्ह असलेले टी- शर्ट, टोपी आणि विशेष साडी हे प्रचार साहित्य सुरत आणि दिल्लीच्या बाजारातून मुंबईत दाखल होत आहे.

डिझायनर एक्सपर्टची मदत

यंदाच्या निवडणूकीत तुतारी आणि मशाल असे दोन नवे निवडणूक चिन्ह आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. त्याासठी मशाल आणि तुतारीचे विविध आकर्षक डिझाईन करण्याचा प्रयत्न आहे.हे चिन्ह मतदारांमध्ये ठसले पाहीजे यासाठी आम्ही विविध डिझाईनरची मदत घेत असल्याचे या व्यावसायिकांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *