मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिर द्वारा वासंतीक क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजनाच्या प्रथम दिवशी ध्वज संचलन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे प्रा. हेमंत सुधाकर सामंत, विजन इंडियाचे अध्यक्ष स्वप्निल राणि नंदकुमार उपस्थित होते. पद्मश्री उदय देशपांडे संचालित श्री समर्थ व्यायाम मंदिर यांचे हे पन्नासावे शिबिर आयोजन असून, विविध वयोगटातील बाराशे मुले आणि त्यांचे पालक या ध्वज संचलन सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित असतात. मोबाईलच्या अत्यंत वाढलेल्या दैनंदिन हस्तक्षेपात मुलांना मैदानी खेळ शिकवून त्यांच्या सर्वांगीण विकास करण्याचे महत्त्वाचे कार्य श्री. देशपांडे सर करत आहेत. असे गौरवोद्गार प्रा. सामंत यांनी काढले.
आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपली क्रीडा पद्धती आपण बाहेरच्या देशात देखील वृद्धिंगत केली पाहिजे.” असे मत विजन इंडियाचे अध्यक्ष स्वप्निल वाडेकर यांनी व्यक्त केले. श्री समर्थ व्यायाम मंदिर संस्थेचे विश्वस्त आणि संचालक मंडळ आणि श्री छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू या सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित होते. सदर वासंतिक क्रीडा शिबिर पुढील आठवडा सकाळ सत्र आणि संध्याकाळ सत्र असे कार्यरत असेल.