ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड, देसलेपाडा डोंबिवली पूर्व येथे करण्यात येत आहे.
सुधागड तालुक्यातील नामवंत संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. सुधागड तालुक्यातील सर्व क्रीडा रसिक, खेळाडू, हितचिंतक, देणगीदार, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवावी.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 21 हजार आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15 हजार आकर्षक चषक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10 हजार व आकर्षक चषक तर सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड, पब्लिक हिरो यासाठी आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे लाईव्ह युट्यूब प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
– ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी जयेश ठाकूर 9867755986, जनार्दन बेलोसे – 9890360265 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.