कल्याण : ठाणे, लोकसभा निवडणूकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दोन तर भिवंडीतून एकदम ५४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
शुक्रवारी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये १) सुशिला काशिनाथ कांबळे, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) व २) अमित उपाध्याय, राईट टू रिकॉल पार्टी (Right to recall party) यांनी प्रत्येकी १ नामनिर्देशनपत्र तर भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ७, धनवान भारत पार्टी १, सायुंकत भारत पक्ष १, न्यू.राष्ट्रीय समाज पार्टी १, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ५, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ३, राष्ट्रीय किसान पार्टी १, बहुजन समाज पार्टी १, लोकराज्य पार्टी २,
अपक्ष २६ असे एकूण ५४ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.