नवी मुंबई : थोर  संत व समाजसुधारक संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

संत तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात हिरीरिने सहभागी झाले. त्यांच्या या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे 50 पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *