अशोक गायकवाड

भिवंडी : २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला यांची मतदानातील टक्केवारी वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या पथकाने भिवंडीतील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात उपस्थित तृतीयपंथीय तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांची भेट घेऊन सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर यांनी केले आहे.

तृतीयपंथीय मतदार, देहविक्रय करणाऱ्या महिलांमध्ये मतदान जनजागृती होणे आवश्यक आहे, यासंदर्भात निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करीत आहे. याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या संचालक दिपाली मासिरकर, वरिष्ठ सल्लागार साधना राऊत, आणि कक्ष अधिकारी उदिता कांडपाल, मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयातील कार्यक्रम अधिकारी पल्लवी जाधव यांनी भिवंडीतील लाहोटी कंपाऊंड येथील अस्मिता फाउंडेशनच्या कार्यालयात तृतीयपंथीय मतदार, तसेच देह विक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित तृतीयपंथीय, देह विक्री करणाऱ्या महिला मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदान करण्यासाठी आवाहन केले. यावेळी १३७ भिवंडी पूर्व मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप,१३६ भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अस्मिता मोहिते, नायब तहसीलदार स्मितल यादव, मनपा उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त अजय एडके, भिवंडी महानगरपालिका निवडणूक प्रमुख नितीन पाटील तसेच दोन्ही मतदारसंघाचे स्वीप पथकाचे अधिकारी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *