जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
राजीव चंदने
मुरबाड : नगरपंचायतचे हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटणाऱ्या राहुल हिंदुराव या ठेकेदाराने लाखो रुपयांचा काळा पैसा मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत टाकला असल्याने नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली असुन या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे करीत असुन त्या चौकशी कडे तमाम मुरबाड करांचे लक्ष लागले आहे.
मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने नगरोथ्तान योजनेतुन कोट्यवधी रुपये मुरबाड नगरपंचायतला दिले.मुरबाड नगरपंचायतने हि कामे आपल्या मर्जीतील ठेदारांना देऊन शासनाचा निधी खर्च केला मात्र उघडी गटारे, रस्ते व शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वस्तीत येत असल्याने त्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली असता सदर ठिकाणी राहुल हिंदुराव या ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत परंतु ती कामे अस्तित्वात नसल्याचे उघड झाले.याबाबत शिवसेना कार्यकर्ते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे ,सागर भंडारी,दिपक दुधाळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली असता प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उजेडात आणला, त्यामुळे ठेकेदाराचे पायाखालची वाळू सरकली व त्याने मुरबाड नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरोथ्तान खात्यावर सुमारे आठ लाख चौतीस हजार रुपये जमा केले.याबाबत नगरपंचायतीने राहुल हिंदुराव ठेकेदाराला लेखी पत्र दिले असता त्याने समाधान कारक खुलासा केला नाही त्यामुळे नगरपंचायतने जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत.
कोट
मुरबाड नगरपंचायतीच्या नगरोत्थान खात्यावर संबंधित ठेकेदाराने अनाधिकृत पणे जमा केलेल्या रकमेची जिल्हाधिकारी स्तरावरुन चौकशी सुरू आहे.त्याचे चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे आहेत –मनोज म्हसे.मुख्याधिकारी.मुरबाड नगरपंचायत.
