Month: April 2024

सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटचा पर्याय

दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी मुंबई : एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकसोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नयेत, यासाठी एसटी महामंडळाने डिसेंबर २०२३ मध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली. या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून दिवसाला ५ ते ६ हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत. यामुळे दरमहा ४ ते ५ कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच वाहकाचे सुट्टे पैसे सांभाळण्याचे कामही हलके होत आहे. सर्वत्र डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी रोख व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन व्यवहार करणे पसंत करतात. एसटी महामंडळानेही डिजिटल व्यवहाराचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला आहे. प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गूगल पे यांसारखी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहकाकडील ॲड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा सुट्या पैशांवरून वाहकासोबत होणारा वाद संपुष्टात येऊ लागला आहे, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे. सध्या एसटी महामंडळातील सुमारे ३४ हजार वाहकांकडे ॲड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र आहे. बहुतेक वाहकांना हे मशीन जलदगतीने व्यवस्थित हाताळता येत नाही. त्यामुळे वाहक प्रवाशांकडे रोख रकमेने तिकीट काढण्याचा आग्रह धरतात. तसेच यूपीआय पेमेंटबाबत प्रवाशांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. तसेच वाहकांना ॲड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र चालवण्याबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली आहे.

ईडी माझ्याकडे द्या,  मग दाखवतो- राऊत

मुंबई :  ” आठ दिवसासाठी ईडी आणि सीबीआय ही खाती मला द्या फक्त आठ दिवसासाठी, मी भाजपाला दाखवून देतो, ही खाती कशी चालवतात ते, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले…

‘अन्याय सहन केलात, आता लढायला सज्ज व्हा’

राजन विचारे यांचं भावनिक आवाहन ठाणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि ठाण्यातील आपल्या शाखा काबीज करण्याचे काम या मंडळींने केले. शिवसेनेसाठी वर्षानुवर्षे राबलेल्या महिला आघाडीतील एका कार्यकर्तीचे झुणका भाकर केंद्र होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ते तिला दिले होते. ती उद्धव ठाकरेंची साथ सोडत नाही हे पाहून हे झुणका भाकर केंद्र या मंडळींनी पाडायला लावले. पालांडे नावाचे माजी सैनिक असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाच्या सोनोग्राफी केंद्राला नोटीस बजावली. इतका अन्याय सहन करुनही आपण लढत राहीलो. अन्याय सहन केलात आता पेटून उठा त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे भावनिक आवाहन ठाणे लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी ठाण्यातील सावरकरनगर भागात प्रचाराचा शुभारंभ करताना केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरकरनगर, लोकमान्यनगर भागात महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना विचारे यांनी उपस्थितांना आणि विशेषत: पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिघे साहेबांचे आशिर्वाद आपल्या मागे आहेत, निर्धास्त रहा असे भावनिक आवाहन केले. ज्या महिलेला उदरनिर्वाहासाठी दिघे साहेबांनी झुणका भाकर केंद्र देऊ केले, ती महिला तुमच्या गटात सहभागी होत नाही म्हणून एका रात्रीत तिचे केंद्र पाडले. पालांडे नावाचे पंच्चाहत्तरी गाठलेले माजी नगरसेवक आहेत. माजी सैनिक म्हणून या व्यक्तीला ठाण्यातील राजकीय वर्तुळात आदराचे स्थान आहे. या वयात पक्ष कसा सोडायचा या विवंचनेत असल्याने ते आहेत तेथेच राहू या भूमीकेत होते. त्यांच्या मुलाचे सोनोग्राफी केंद्र आहे. जागा भाड्याने घेऊन त्यांच्या डाॅक्टर मुलाने ते सुरु केले होते. या केंद्राला नोटीस बजावून त्यांना धमकाविण्यात आले. दिघे साहेबांच्या काळात मोठया प्रयत्नांनी उभ्या केलेल्या एकएक शाखा यांनी बळजबरीने ताब्यात घेतल्या. पोलिस, प्रशासन, दादागिरीच्या जोरावर हम करे सो कायदा असा सगळा कारभार होता. ठाण्यात ठाकरेंना मानणारे शिल्लक ठेवायचे नाहीत अशाच पद्धतीचे काम सुरु होते. तरीही आपण उभे राहीलो, लढलो. जुन्या शाखा गेल्या खिशातील पैसे टाकून वस्त्यावस्त्यांमधून नव्या शाखा उभ्या केल्या. सगळच पैशाने विकत घेता येत नाही, निष्ठा नावाची काही चिज असते की नाही, असा घणाघात विचारे यांनी यावेळी केला. राज्य आणि ठाणे ओरबडले जातय यावेळी बोलताना विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सरकार आणि महापालिकेच्या कारभारावर टिका केली. आज ठाणे महापालिकेची अवस्था पहा. गेल्या काही दिवसांपासून येथील कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे शिल्लक नाहीत. आपले सरकार आहे किती काळ टिकेल माहीत नाही. त्यामुळे लुटा आणि ओरबाडून घ्या असा कारभार ठाणे महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये सुरु आहे. सर्वसामान्य माणसाला हे दिसत नाही असे तुम्हाला वाटत असेल. परंतु त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, अशी टिका विचारे यांनी केली. ही शेवटची लढाई आहे असे समजा. परंतु एकत्र या. लोकांना समजावून सांगा, आमचा पराभव झाला तर तो निष्ठेचा, न्यायाचा पराभव असेल. इतके दिवस अन्याय सहन केलात आता लढायला तयार व्हा, असे आवाहन यावेळी विचारे यांनी केले.

काँग्रेसच्या विरोध मोडून पवारांचा भिवंडीवर दावा

भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी स्वाती घोसाळकर मुंबई: काँग्रेसचा विरोध मोडून शरद पवारांनी आज पॉवरफुल चाल करीत भिवंडीवर दावा तर सांगितलाच पण राज्यात दोन तगडे उमेदवारही उभे केले आहेत. शरद पवारांनी आज…

दिनेश उघडे पुरस्काराने सन्मानित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार राजीव चंदने मुरबाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मुरबाड तालुका  अध्यक्ष दिनेश उघडे यांनी केलेल्या सामाजिक कार्यात असलेली उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान होतं असतो, अतिशय शांत संयमी स्वभावाचे, सतत सामाजिक कार्यासाठी धडपड करणारा व्यक्तिमत्व यांचा सन्मान गोवा राज्यातील साहित्य कला सांस्कृतिक भवन पणजी या ठिकाणी, डी.जी राठोड  फाउंडेशन व गार्गीज डी.आय.डी फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.शिवाजी शिंदे  यांच्या अध्यक्षते खाली व उदघाटक डॉ. वैद्य गुंडोपंत सुतार, निसर्गपचार तज्ञ तसेच प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक सदानंद संदाशिव  व गोवा प्रसिद्ध अभिनेत्री अमित्रा नायक सलत्री सह द्विगज मान्यवरांचे शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा पुरस्काराने त्यानां सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या समवेत आंबेडकरी चवळीतील नेते भगवान पवार, रामचंद्र थोरात,रमेश देसले,महेंद्र धनगर,पत्रकार संजय बोरगे, शंकर करडे, संतोष उघडे, लक्ष्मण पवार, जितू पंडित, केतन साटपे,जितू अहिरे,ह्या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच उघडे यांना पुरस्कार प्रदान केल्या मुळे यांच्या वर मुरबाड तालुक्या सह सर्वत्र महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

डॉ.मीनल जाधव हिचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सत्कार

माथेरान : माथेरान मधील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील शिक्षक विनोद जाधव यांची मुलगी मीनल हिने होमिओपॅथी मेडिकल मध्ये डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मीनलचे पालक शिक्षक विनोद जाधव आणि आई सीमा जाधव उपस्थित होत्या.मीनल जाधव हिचे चौथी पर्यंतचे शिक्षण आसल( कर्जत) इथे झाले त्यानंतर अकरावी,बारावी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत आणि त्यानंतर केडीएमसी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शिरपूर (धुळे) याठिकाणी झाले. तिने डॉक्टर पदवी२९ मार्च रोजी प्राप्त केली आहे केल्या या तिच्या यशाबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नेरळ येथील छत्रपती शिवाजी मैदान जवळील हॉलवर भव्य सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मीनलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

संवाद मेळाव्याचे आयोजन

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचार कामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना राज्य समन्वयक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, नरेंद्र शिंदे, जिल्हा महिला संघटक लता पाटील, प्रियंका पाटील अनिता गौरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या कळवा – मुंब्रा शहरात गेल्या दशकभरात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा वेगवान करण्यासाठी उड्डाणपूल यांसह विविध सुविधा उभारण्यात आल्या. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व विकासकामे पूर्णत्वास गेली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे या सर्व कामांचा लेखाजोखा आपल्याला नागरिकांसमोर अगदी सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने आता मांडायचा आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करण्याचे सर्वांना यावेळी आवाहन केले. आपण केलेली जनहिताची कामे, विकास प्रकल्प तसेच शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली अनेक कामे नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहनही यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले.

काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी –  केशव उपाध्ये

अनिल ठाणेकर ठाणे : अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली . मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही . अशा काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते. नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाह हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले.केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल. गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी मोहब्बत की दुकान सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. गरीब, युवक, महिला, शेतकरी या चारच जाती देशात असून त्यांच्या विकासाकरिता भाजप कटिबद्ध असल्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिली आहे. गरीबी हटाव नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली,  देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला.  शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला, पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली  प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम ३७० रद्द करणे , राम मंदिर उभारणी , औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी,  महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेतील पोकळपणा जनतेस माहीत आहे, याची जाणीव असूनही मोदी यांची नक्कल करताना काँग्रेसने आपली अक्कल एवढी गहाण टाकली, की मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात. अशा नक्कल करण्याच्या हतबलपणामुळेच आता काँग्रेसने पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत. अशा पाच पंचवीस फसवणुकांतून जनता यापूर्वीही गेलेली असल्याने, आता नक्कल देखील कामाला येणार नाही, अशी खिल्ली प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उडवली.

महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केली. बुधवारी सायंकाळी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले) व मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी खासदार संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, रिपाईचे सुरेश बारशिंगे, भास्कर वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उमेदवाराचे नाव घोषित केल्यावर कोणीही इकडे तिकडे जाणार नाही, शिवसेना मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तीनही नेते जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू, यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपल्या भाषणात बोलताना केले. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच असल्याचे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, हाच धागा पकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले की, ठाणे लोकसभेत सन्मानजनक उमेदवार दिला जाईल. आघाडी कोणाची आहे, उमेदवार कोण आहे यापेक्षा नरेंद्र मोदीं यांना पंतप्रधान करण्यासाठी देशात ४०० पार व महाराष्ट्रात ४५ प्लस पार जागा निवडून आणुया, असे आवाहन उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ना. शंभूराज देसाई यांनी केले.