Month: April 2024

समांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गठित करण्याचा हा अव्यापारेषु व्यापार थांबवावा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच देशाचा निवडणूक आयोग यांच्याकडे नुकतीच एक तक्रार केली आहे. त्यात नागपुरातील जनार्दन मून नामक व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या…

महाराष्ट्राला दुहेरी मुकुटासह सुवर्णपदक

 ५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्ली (क्रि. प्र.), दिल्ली येथील करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे संपन्न झालेल्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने डबल धमाका करताना…

मालमत्ता कराची 716.97 कोटी वसूली

मागील वर्षीपेक्षा 83.66 कोटी रक्कमेची अधिक वसूली नवी मुंबई : मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा सर्वात मोठा स्त्रोत असून या आर्थिक वर्षात सन 2023-2024 मध्ये रु. 716.97 कोटी रक्कमेचे उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झाले असून ते मागील 2022 -2023 वर्षापेक्षा 83.66 कोटींनी अधिक आहे. मालमत्ता कर विभागाने वर्षभरात जमा केलेल्या महसूलाचा हा आत्तापर्यंतचा विक्रम आहे. मागील वर्षी महानगरपालिकेकडे मालमत्ता करापोटी 633.31 कोटी इतकी रक्कम जमा झाली होती. यावर्षी वसूलीचे सुयोग्य नियोजन करीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मालमत्ता कर थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांच्या थकबाकी रक्कमेनुसार उतरत्या क्रमाने यादया तयार करण्यात येऊन अधिकाधिक महसूल वसूलीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पाठपुरावा करण्यात आला. याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळावा व थकीत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा व्हावा यादृष्टीने 1 ते 31 मार्च 2024 या कालावधीत मालमत्ताकर अभय योजना लागू करण्यात आली. यामध्ये 1 ते 20 मार्च या कालावधीत थकबाकीच्या दंडात्मक रककमेवर 75% सवलत तसेच 21 ते 31 मार्च या कालावधीत 50% सवलत लागू करण्यात आली होती. या योजनेचा लाभ नागरिकांनी मोठया प्रमाणावर घेतला व 8740 थकबाकीदारांनी 116 कोटी इतकी रक्कम अभय योजनेअंतर्गत थकबाकीच्या दंडात्मक रक्कमेवरील सुटीचा लाभ घेत भरणा केली. या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना रु. 45.56 कोटी इतकी रक्कम सवलत देण्यात आली. याचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत 83.66 कोटी रक्कमेने अधिकची मालमत्ता करवसूली झाली. नागरिकांना मालमत्ता कर भरणा करणे सुलभ व्हावे यादृष्टीने आवश्यक काळजी घेत या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन दिवस सार्वजनिक सुट्टी आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता महानगरपालिकेची सर्व कार्यालये  व नागरी सुविधा केंद्रे करभरणा करण्यासाठी सुरु ठेवण्यात आली. त्यामुळे सुट्टीच्या तीन दिवसात 29 मार्चला 28.78 कोटी, 30 मार्चला 8.38 कोटी व 31 मार्चला 4.10 कोटी अशाप्रकारे अखेरच्या 3 दिवसात एकूण 41.26 कोटी इतकी रक्कम जमा झाली. त्याचप्रमाणे मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात 163.50 कोटी इतक्या रक्कमेचा करभरणा नागरिकांनी केला. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या विकास प्रक्रियेला नेहमीच गती मिळालेली असून मालमत्ता करापोटी जमा होणारी रक्कम ही दर्जेदार नागरी सेवासुविधा पूर्तीसाठी वापरली जात असल्याने नवी मुंबईकर नागरिकांनी शहराच्या प्रगतीत आपले योगदान दिलेले आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराची रक्कम विहित कालावधीत भरणा केल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

कामगार,शेतकरी विरोधी मोदी सरकारला पराभूत करा! 

संघटना संयुक्त कृती समितीच्या परिषदेत एकमुखी ठराव! मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, किसान,जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सम्मत करण्यात आला.  राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे‌ राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले.त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला.इंटक,आयटक, एसएमएस,सिटू,एआयसीसीटीयू,बीकेएस एम,राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे‌ नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या.व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते,डॉ.कैलास कदम ,डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी,  निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिनभाऊ अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदारा चे हित जोपासत आहे.भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनां नी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी चार श्रम संहिता आणल्या आहेत. हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार! अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे. कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डि. एन.कराड ठरावावर म्हणा ले,आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबीय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य मोठाच या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधी मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असेही कराड आपल्या भाषणात म्हणाले.महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले,येणारा एक मे कामगार दिन मोदी सरकार विरोधी कामगार निषेधदिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले,अंगणवाडी,आशा कामगार पासून  गिरणी कामगारां पर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे. या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे मिलिंद रानडे, कॉ.उदय भट,कॉ. विवेक मोंटेरो, कॉ.उदय चौधरी, निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात मोदीं सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात मोदी सरकारला  महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. ०००००

सर्वसाधारण अजिंक्यपदाची महाराष्ट्रीची ‘हॅटट्रीक’

२०वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा मनाली रत्नोजी स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू मुंबई : पंचकुला, हरयाणा येथे आज संपन्न झालेल्या २०व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग तिस-या वर्षी महाराष्ट्राने या प्रकारामधील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सर्वसाधारण विजेतेपदाची “हॅटट्रीक” साधली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सायकपट्टूंनी ६ सुवर्ण ४ रौप्य अशी एकूण १० पदके पटकावताना ४८ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १ सुवर्ण ८ रौप्य आणि एक कांस्यपदकासह ३७ गुण मिळवून कर्नाटकास या स्पर्धेमधील उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत नाशिक दुर्गम भागातील योगेश सोनावने याने तीन सुवर्ण पदके आणि पुण्याची मनाली रत्नोजी हिने महिला ज्युनिअर गटात २ सुवर्ण आणि १ रौप्य पदक पटाकावताना महाराष्ट्राच्या विजयात मोवाची कामगिरी केली. मनालीने स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा मान मिळवला. काल शेवटच्या दिवशी नाशिकच्या ऋतिका गायकवाड हिने वुमेन ईलीट गटात एक्ससीओ (क्रॉस कंट्री ऑलल्पिक) प्रकारात १ ता. ३२ मि ४२.८११ से. वेळ देत सुवर्णपदकावर आपला ठसा उमटवला. कर्नाटकच्या स्टार नारझरी हिना १ ता. ३५ मि. ४४.६४७ से. वेळ नोंदवताना रौप्यपदक तर उत्तराखंडच्या सुनिता श्रेष्ट हिने १ ता. ३८ मि. ४६.१४२ से. वेळ देत कांस्पदक मिळवले. ऑक्टोबर २०२३ मध्ये केरळ येथे झालेल्या आशियाई एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत ऋतिका गायकवाड, मनाली रत्नोजी यांनी भारताचे प्रतिनीधीत्व केले होते. महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंकडून पदक विजेती कामगिरी करुन घेण्यात सलग पाच वर्षे प्रशिक्षकापदाची जबाबदारी सांभाळणा-या बिरु भोजने यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑप महाराष्ट्राचे अध्यक्ष अड विक्रम रोठे, उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव प्रा. संजय साठे, आश्रयदाते विजय जाधव, खजिनदार भिकन अंबे यांनी अभिनंदन केले.

प्रशांत मोरे-काजल कुमारी विजयी

रोटरी क्लब राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत आजी माजी विश्व विजेत्यांच्या रंगतदार लढतीने गाजली. माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने यामध्ये बाजी मारली. अंतिम सामन्यात त्याने मुंबई उपनगरच्या विद्यमान विश्व् विजेत्या संदीप दिवेचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला. अंतिम फेरीत नाणेफेक जिंकलेल्या संदीपने पहिल्याच बोर्डात व्हाईट स्लॅम करून १२ गुणांची आघाडी घेतली. परंतु तरीही आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सहाव्या बोर्ड अखेरीस प्रशांतने १९-१७ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र सातव्या बोर्डात संदीपने पुन्हा व्हाईट स्लॅमची किमया करत २५-१९ अशा फरकाने पहिला सेट आपल्या खिशात घातला. त्याचा फॉर्म पाहता तोच या स्पर्धेतील विजेता ठरणार हि प्रेक्षकांची अपेक्षा प्रशांतने फोल ठरवत दुसरा सेटअगदी सहज २३-६ असा जिंकून सामन्यात रंगात निर्माण केली. या अंतिम फेरीच्या तिसऱ्या सेटने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दोनही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावले. सातव्या बोर्ड संपल्यावर प्रशांतकडे १४-१३ अशी केवळ एका गुणांची आघाडी होती. परंतु ब्रेक त्याचा असल्याने प्रशांत हा सामना सहज जिंकेल असे सर्वाना वाटत होते. मात्र संदीपने अगदी शेवटच्या बोर्डापर्यंत झुंज दिली. प्रशांतच्या हाताखालील असलेली आपली शेवटची सोंगटी संदीपने डबल टचचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवी संदीपची सोंगटी थोडक्यात चुकली आणि प्रशांतने आपली शेवटची सोंगटी घेत बाजी मारली व रोख रुपये २५ हजारांचे ईनाम आपल्या खिशात घातले. अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रशांत मोरेने उपान्त्य लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानचे आव्हान १८-१४, १६-११ असे परतवून लावले. तर संदीपने मुंबईच्या पंकज पवारला २५-१२, २२-८ असे सहज पराभूत केले होते. याउलट महिला एकेरीचा अंतिम सामना अगदी एकतर्फी झाला. मुंबईच्या काजल कुमारीने या लढतीत उदयोन्मुख समृद्धी घाडीगावकरचा २५-०, २५-१० असा सहजच पराभव करून रोख रुपये २५ हजारांचे बक्षिस मिळविले. उपांत्य लढतीत काजलने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला तीन सेटमध्ये २५-१२, १५-१८, २४-१० असे हरविले होते. तर समृद्धीने पालघरच्या श्रुती सोनावणेचा कडव्या लढतीनंतर २२-८, ९-२३, २१-८ असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत महम्मद घुफ्रानने पंकज पवारला २१-११, २५-१५ असे हरवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर महिला एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत श्रुती सोनावणेने प्राजक्ता नारायणकरवर झुंजीच्या लढतीत २५-१७, १५-२५, २५-११ असा विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकाचे ईनाम पटकाविले. विजेत्या खेळाडूंना रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भार्गव, रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरच्या अध्यक्षा डॉ. मोनिका टंडन, चेअरमन स्पोर्ट्स विवेक पै, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब तर्फे प्रसाद देवरुखकर यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी खूप मेहनत घेतली.

नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 2 धावांनी विजयी

एमसीए प्रेसिडेंट कप ए डिव्हिजन स्पर्धा मुंबई : एमसीए प्रेसिडेंट कप ए डिव्हिजन स्पर्धेत नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबवर 2 धावांनी विजय मिळविला. मुंबई पोर्ट ट्रस्ट…

ईदच्या मुहूर्तावर ‘अमीना’ प्रदर्शित होणार

रमेश औताडे मुंबई :राज कुमार प्रॉडक्शन्स सध्या आपला आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अमीना’ मुळे चर्चेत आहेत. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता जो…

परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

ठाणे : ठाणे परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने इलेक्ट्रिक बसचा समावेश होत आहे. तसेच येत्या काळात आणखी नव्याने बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परंतु परिवहनच्या ताफ्यात वाहकांची कमतरता असल्याने १०० बस धुळखात पडून असल्याची माहिती समोर आली होती. अखेर ठाणे परिवहन सेवेमार्फत पुढील तीन वर्षासाठी तब्बल ४८६ वाहक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर झाला असून त्यापोटी ३७ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. परंतु आता ही भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतरच पार पडणार असल्याने ठेकेदार अंतिम होऊनही जून महिन्यातच ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली. परिवहनच्या ताफ्यात सध्यस्थितीला ३५० च्या आसपास बस आहेत. त्यात इलेक्ट्रिक ११३ च्या आसपास बस दाखल झाल्या आहेत. त्यातील ९९ बस रस्त्यावर धावत आहेत. तर उर्वरीत सात बस या वाहक नसल्याने आगारात पडून आहेत. परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ठेकेदाराच्या २४०, परिवहनच्या स्वत:च्या १५० च्या आसपास, व्होल्वो ३०, इलेक्ट्रिक ११३ बस आहेत. परिवहनमधून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसपैकी यापूर्वी १५३ बस या जुन्या झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. तसेच दोन महिन्यापूर्वी आणखी १७ बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. परंतु आता परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या वाढत आहे. येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात पीएम ई बस योजनेतून पालिकेला शंभर विद्युत बस उपलब्ध होणार आहेत. परिवहन उपक्रमामध्ये ९५२ वाहक कार्यरत आहेत. त्यामध्ये ६२१ कायमस्वरुपी वाहक आहेत. उर्वरीत कंत्राटी वाहक आहेत. त्यात २०६ पुरुष आणि १२५ महिलांचा समावेश आहे. ठाणे परिवहन कार्यालयातील इतर विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा कामाचा भार काही कायमस्वरुपी वाहकांवर सोपविण्यात आला आहे. ६२१ पैकी १८० वाहकांना कार्यालयीन कामांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण होऊन बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. दुसरीकडे वाहकांची कमतरता असल्याने आजही नव्याने दाखल झालेल्या सुमारे १०० बस धुळ खात पडून असल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान आता परिवहनच्या ताफ्यात ४८६ कंत्राटी स्वरुपात वाहक घेण्यासंदर्भात निविदाकार अंतिम करण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याची माहिती परिवहन सुत्रांनी दिली. त्यानुसार तीन वर्षासाठी हे कर्मचारी घेतले जाणार असून त्यापोटी ३७ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातही वाहक भरतीसाठी केवळ एकच ठेकेदार आल्याने अखेर पालिकेने तो अंतिम केला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जूनमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच भरतीची ही प्रक्रिया मार्गी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.