‘टाटा सन्स’ने समूहाच्या आणखी एका कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. ‘टाटा सन्स’ने सिंगापूर गुंतवणूक कंपनी ‘टेमासेक’कडून दहा टक्के शेअर्स खरेदी करून ‘टाटा प्ले’मधील आपला हिस्सा वाढवला आहे. या करारानंतर ‘टाटा प्ले’मध्ये टाटा समूहाचा हिस्सा ७० टक्के झाला आहे. हा करार सुमारे १०० दशलक्ष डॉलर्सचा (८३५ कोटी रुपये) आहे.
टाटा समूहाने आपली हिस्सेदारी वाढवण्यासाठी सिंगापूरच्या एका गुंतवणूक फर्मकडून शेअर्स खरेदी केले आहेत. त्यानंतर ही भागीदारी ७० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ‘टाटा प्ले’ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नियमानुसार या बदलाशी संबंधित माहिती दिली आहे. ‘टाटा प्ले’ हा टाटा समूहाचा मनोरंजन क्षेत्रातील एकमेव व्यवसाय आहे, जो थेट ग्राहकांशी जोडलेला आहे. त्याची किंमत अंदाजे एक अब्ज डॉलर्स एवढी आहे. ही देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी आहे आणि तिचा ग्राहक आधार २१ दशलक्ष इतका आहे.
‘टाटा प्ले’मध्ये टाटा समूहाची हिस्सेदारी आता ७० टक्के तर वॉल्ट डिस्नेची हिस्सेदारी ३० टक्कयांपर्यंत वाढली आहे. ‘डिस्ने’ला टाटा प्लेमध्ये २० टक्के वाटा मिळाला आहे. वृत्तानुसार, टाटा ‘डिस्ने’सोबत त्यांचा हिस्सा विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे. डीटीएच व्यवसाय डिस्नेच्या मुख्य व्यवसायापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ते त्यातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. देशातील २१ व्या शतकातील ‘सेंचुरी फॉक्स’चा व्यवसाय विकत घेतल्यानंतर ‘डिस्ने’ला ‘टाटा प्लेम’ध्ये २० टक्के हिस्सा मिळाला. ‘डिस्ने’ने आपला ‘स्टार इंडिया’ व्यवसाय ‘रिलायन्स’च्या ‘व्हायकॉम १८’ मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतर ती ८.५ अब्ज डॉलरची मोठी मीडिया कंपनी बनेल. डिस्ने एंटरटेनमेंटच्या दुसर्या विभागात काम करत आहे. ‘डिस्ने’ आता मनोरंजनक्षेत्रातील आणखी एका विभागात काम करत आहे आणि ‘टाटा प्लेम’ध्ये त्याचा व्यवसाय विलीन करू इच्छित आहे, असे मानले जात आहे. ‘टाटा प्ले’चे प्रारंभिक शेअर्स विकण्याच्या योजनेला ‘सेबी’ने मे २०२३ मध्ये मान्यता दिली होती. ‘टेमासेक’ नावाच्या गुंतवणूक कंपनीने २००७ मध्ये या प्लॅटफॉर्ममध्ये पैसे गुंतवले होते.
