मुंबई : यंदाच्या मे महिन्यात देशातील तापामानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे एकुणच भारताला हा मे महिना अधिक तापदायक ठरणार आहे.
मे महिन्यात देखील देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात देखील अनेक ठिकाणी मे महिन्यात उष्णतेच्या लाटा सरासरी दिवसांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे.
कोकणातील तापमान मे महिन्यात सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता
कोकणातील तापमान मे महिन्यात सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. साधारणपणे मे महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात जवळपास 3 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळत असते.मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या साधारण 5 ते 8 दिवसांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
