निवडणुकीच्या दिवशी मेट्रो तिकिटावर १० टक्के सवलत

मुंबई: लोकसभेच्या मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आता मेट्रोने नवी शक्कल लढविली आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ  आणि ७ च्या सर्व प्रवाशांना येत्या २० मे रोजी मतदानाच्या दिवशी प्रवासी तिकिटावर दहा टक्के सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग २  अ आणि ७ च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ९० कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे.

मुंबई मध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होणार आहे.

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना  केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता येणार आहे असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *