ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीमध्ये २०१९ च्या तुलनेत १३ कोटींनी वाढ झाली आहे. त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी एकूण १४ कोटी ४३ लाख ८० हजार ७९० रुपयांची मालमत्ता आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची मालमत्ता १ कोटी ६७ लाख ५९ हजार ५१५ इतकी होती.
एकूण संपत्ती – १४,४३,८०,७९० (२०१९ मध्ये १,६७,५९,५१५)
रोख रक्कम – ३,९९,०२१ पत्नीकडे – १,४१,४५२
जंगम – ४,७९,६४,९२७ पत्नीकडे – ३,३५,४३,८८५
स्थावर – २,३४,५४,००० पत्नीकडे – ३,९४,१७,९७८
कर्ज – १,७७,३६,५५० पत्नीकडे – ४,८५,८३,८९३
दागिने – त्यांच्याकडे ११ लाख ३४ हजार ५२९ रुपयांचे सोने, ४ लाख ९७ हजार १३७ रुपयांची हिऱ्याची अंगठी, १ लाख १० हजार ५०० रुपयांचे दोन घडयाळे आहेत. पत्नीकडे २२ लाख ८२ हजार ७२५ रुपयांचे सोने, ७ लाख ५६ हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी, १ लाख ६३ हजार ८७२ रुपयांचे चांदीचे दागिने आणि ३ लाख ४४ हजार १७ रुपयांचे दोन घडयाळे आहेत.
वाहने – नाही
शेती – श्रीकांत शिंदे यांच्या नावे सातारा जिल्ह्यातील दरे गावात तर, पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या हुमरमाळा गावात शेतजमीन आहे. ’ सदनिका -पत्नीच्या नावे ठाण्यातील पाचपाखाडी येथे देव अशोका, कळवा येथे इंद्रायणी को-ऑप. सोसायटी, ठाण्यातील रहेजा गार्डन येथे अॅस्कोना अमाल्फी येथे सदनिका आहे.