बारामती पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवरती बातम्या झळकत होत्या. त्यावेळी टीव्हीसमोर शरद पवार साहेब तसेच आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या. मात्र त्यांनी न डगमगता काळजी करू नका, असे सांगितलं होतं. जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते, असे रोहित पवार यांनी सभेमध्ये सांगताच एकच सन्नाटा पसरला. हा प्रसंग सांगत असतानाच रोहित पवार यांना अश्रु अनावर झाले.

पवार साहेब परत पुन्हा असे शब्द वापरू नकाआम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांसमक्ष दिलीरोहित पवार यांना अश्रू अनावर झाल्यानंतर मैदानात सन्नाटा पसरला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *