उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाजकंटकाने केली होती. सदर इसमावर उरण पोलीस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्हयाबाबत रीतसर एफ.आय. आर देखील नोंदविण्यात आले.मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर इसमावर कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही. सदर इसमावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाली नाही. त्यामूळे संतप्त ग्रामस्थांनी आज मतदानाच्या दिवशीच म्हणजेच १३ मे २०२४ रोजी मतदानावरच जाहीर बहिष्कार घातला आहे.याबाबत सदर सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले होते.
घडलेल्या घटनाबाबत सदर आरोपीवर कोणतेही कठोर कायदेशीर कारवाई झालेली नाही. जर आरोपीवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकीवर जसे बहिष्कार टाकले तसेच बहिष्कार विधानसभेच्या निवडणूकीवरही घालण्यात येणार आहे.असे मत आगरी कोंढरी पाडा ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील यांनी दिली.