उल्हासनगर – कल्याण लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर विधानसभा मतदार संघाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे.त्याकरिता 251 मतदान केंद्र,120 कंट्रोल व बॅलेट युनिट आणि 130 VVPAT यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप-विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय तसेच निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दोन टप्यात कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या ही 2 लाख 48 हजार 904 आहे.मागच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 49.6 टक्के मतदान झाले होते.यावेळेसच्या निवडणुकीत आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली असून त्यास किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो हे 20 मे रोजी होणाऱ्या मतदाना नंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *