ठाणे : पावसाळी हंगामात दि. 26 मे ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदणीकृत जलयानाना समुद्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रविण खरा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळी हंगामात दरवर्षी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सर्व बंदरांमधून जलयानांना समुद्रात जाण्यापासून बंदी घालण्यात येते. यावर्षीही दि. 26 मे ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोणतीही जलयाने समुद्रात घेऊन जाऊ नयेत, असे आवाहन श्री. खरा यांनी केले आहे. यासंदर्भात मंडळाच्या अखत्यारीतील सर्व बंदर कार्यालयांना कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
