दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अख्खा आम आदमी पक्षाला केले ‘आरोपी’

नवी दिल्ली : दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज आरोपपत्र दाखल करताना अजब आणि गजब दावा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करतानाच संपूर्ण आप पक्षालासुध्दा ईडीने आरोपी केले आहे. देशातील आजवरची ही पहिलीच घटना असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या पक्षाला राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केलेल्या पुरवणी चार्ट शीटमध्ये आरोपी केलं आहे. आम आदमी पार्टीवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणीही वाढू शकतात. ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की अबकारी धोरण प्रकरणात गुन्ह्याच्या कथित रकमेबाबत अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील चॅट सापडले आहेत.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी गुरुवारी (16 मे) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाला सांगितले की, आम्ही अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाविरुद्ध फिर्यादी तक्रार  सादर करत आहोत. एसव्ही राजू यांनी दावा केला होता की केजरीवाल यांनी 100 कोटी रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे आहेत, ज्याचा वापर आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केला होता. एसव्ही राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल एका सात-तारांकित हॉटेलमध्ये राहिल्याचा थेट पुरावा आमच्याकडे आहे, ज्याचे बिल या प्रकरणातील एका आरोपीने अंशतः दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *