घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण
मुंबई: घाटकोपर येथे होर्डींग कोसळून १६ निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डींगचा मालक भावेश भिंडेला न्यायालयान येत्या २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग केसमध्ये भावेश भिंडेला मुंबई क्राइम ब्रँचने जोधपूरहून अटक केले होते.
आरोपी भावेश भिंडे याच्याकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसह शेजारीत चार होर्डिंगची जबाबदारी होती. त्या प्रत्येक एका होर्डिंगचा खर्च ३ ते ४ कोटीचा असल्याची पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणात भावेशने होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या आहेत का? घेतल्या असतील तर त्याबाबत कुणाची मदत घेतली आहे? असे प्रश्न असून यातील आर्थिक व्यवहारही तपासणे गरजेचे असल्याचे सांगत पोलिसांनी आरोपीची कस्टडी मागितली. त्यानंतर न्यायालयने आरोपीला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.