जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव कळमशेत येथे संपन्न
रायगड : फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रबोधन करताना, प्रमुख वक्ते, पत्रकार अशोक रघुनाथ गायकवाड (कर्जत) यांनी विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध, राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी शाहूजी महाराज, माता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष उभा केला. जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव बुधवार,(दि.१५ मे) रोजी कळमशेत येथे संपन्न झाला. यानिमित्ताने पत्रकार अशोक गायकवाड प्रबोधन करत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, वसंत गायकवाड गुरुजी, पाठारे गुरुजी, युवराज नाक्ते, जानुजी भा. नाक्ते, नरेश लक्ष्मण नाक्ते, देविदास नाक्ते, अनुसया नाक्ते, प्रकाश ग. नाक्ते, काशीनाथ लक्ष्मण नाक्ते आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
जेतवन बुद्ध विहार वर्धापन दिन आणि विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध, देवनांप्रिय प्रियदर्शिनी राजा चक्रवर्ती सम्राट अशोक, राष्ट्रसंत जगतगुरू तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाज संस्थापक खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहूजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व प.पू. महामानव बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई या महामानवांची व महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ, बौध्द हितवर्धक मंडळ स्थानिक आणि नवतरुण बौध्द सेवा संघ कळमशेत, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. बुधवारी, १५ मे २०२४ रोजी नवतरूण बौध्द सेवा संघ, कळमशेत-मुंबईचे अध्यक्ष देवीदास नाक्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. सुत्रसंचालन जगदीश हि. कासे, मंगेश मो. नाक्ते, आ. यशवंत म. नाक्ते यांनी केले.
सकाळी ८.०० वाजता, धम्म ध्वजारोहण करण्यात आले.सकाळी ८.३० वाजता, बुध्द पूजापाठ आणि महामानवांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन ॲड. प्रकाश देवजी गायकवाड, बौध्दाचार्य भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा तळा यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ९.०० वाजता, अल्पोपहार भोजन दाते प्रभाकर पि. नाक्ते यांच्याकडून देण्यात आला. सकाळी ९.३० वाजता, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रबोधन प्रमुख वक्ते, पत्रकार अशोक रघुनाथ गायकवाड (कर्जत) यांनी विश्ववंदनीय भगवान अर्हत सम्यक सम्बुद्ध , राष्ट्रपिता जोतिबा फुले, राजर्षी शाहूजी महाराज, माता सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष यावर प्रबोधन केले. दुपारी १२.०० वाजता, महिलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.दुपारी १.०० वाजता, सर्वांसाठी कौन बनेगा धम्मग्यांनी प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. दुपारचे स्नेह भोजन, भोजन दाते- जर्नादन जा. नाक्ते यांनी दिले तर रात्रीचे स्नेह भोजन कृष्णा द. नाक्ते यांनी दिले. दुपारी ३.०० वाजता, महिलांसाठी विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायं ४.३० वाजता, भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायं ७.०० वाजता, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. रात्री १०.०० वाजता, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
व्यवस्थापक आणि कार्यकारिणी, माता रमाई उत्कर्ष महिला मंडळ, कळमशेत अध्यक्षा अनुसया ज. नाक्ते, उपाध्यक्षा निशा नि. नाक्ते, सचिव वैशाली र. नाक्ते, उपसचिव निलम नरेश नाक्ते, खजिनदार जयश्री भि. नाक्ते, उपखजिनदार सारिका सं. नाक्ते बौध्द हितवर्धक मंडळ स्थानिक, कळमशेत अध्यक्ष नरेश लक्ष्मण नाक्ते, उपाध्यक्ष जर्नादन जा. नाक्ते, उपाध्यक्ष भिमराव पि. नाक्ते, सचिव नितीन बा. नाक्ते, उपसचिव राकेश दौ. नाक्ते, खजिनदार लक्ष्मण पि.नाक्ते, उपखजिनदार अशोक दा. शिर्के नवतरूण बौध्द सेवा संघ, कळमशेत-मुंबई अध्यक्ष देविदास वि. नाक्ते, उपाध्यक्ष सुधाकर यशवंत नाक्ते, सचिव प्रभाकर पि. नाक्ते, उपसचिव मोहन म. नाक्ते, खजिनदार मनोहर भा. नाक्ते, उपखजिनदार मनोज लक्ष्मण नाक्ते, लेखा परीक्षक महेश चं. नाक्ते, उपलेखा परीक्षक संदेश मो. नाक्ते आदी मान्यवर व ग्रामस्थ बंधु- भगनी यांनी उपस्थित राहून व सक्रिय मदत करुन जेतवन बुध्दविहार १८ वा वर्धापन दिन व महापुरुषांची-महामातांची संयुक्त जयंती महोत्सव संपन्न करण्यासाठी सहकार्य दिले.

