विरार : पालघर मतदारसंघात आज खेळाडू, कलाकार आणि साहित्यिकांनी मतदान करून वेगळी जागृती केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू, मोठे साहित्यिक आणि कलाकारांचा समावेश होता. त्यांच्या मतदानाने मतदान जागृतीला चालना मिळाल्याचे बोलले जात आहे.
वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू, कलाकार आणि साहित्यिकांनी मतदान करून मतदान जागृतीचा जागर केला. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे, साहित्यिका विना गव्हाणकर, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकपटू आनंद मिनजीस, कलाकार मृणालिनी जावळे, नेमबाज दर्शना जावळे, क्रीडापटू योगेश चोधारी, प्रकाशक अशोक मुळे यांनी आज सकाळी मतदान करून मतदानासाठी जागृती करण्याचे काम केले.
