अशोक गायकवाड

मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा (समता) हि शिकवण व्यक्तींना, समाजाला तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक आहे. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. बुद्धपौर्णिमेच्या मंगल प्रसंगी मी भगवान बुद्धांना त्रिवार वंदन करतो व सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल रमेश बैस यानी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *