मुंबई : अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारतातील लोकसभेचे निकाल चार जूनल लागणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टे चार जूनला दारू बंदी करून जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केला होता. पण या निर्णयाविरोधात बार मालकांच्या संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी करताना ड्राय डेचा हुकुम रद्दबातल करीत दारू पिण्यात परवानगी दिली आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जिंकणाऱ्यांना चिअर्स आणि हरण्यांना गम म दम मारण्याची बहाणा मिळाला आहे…
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वच मतदारसंघात मतदानच्या दिवशी दारुबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे, मतदान होईपर्यंत मतदारसंघातील दारुची दुकाने, बार बंद ठेवण्यात आले. शेवटच्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. त्यामुळे, येथील वाईन शॉप, दारु दुकाने, पब यादिवशी बंद ठेवण्यात आले होते. आता, 4 जून रोजी मतमोजणी होत असून त्यादिवशीही दारु दुकाने, वाईन शॉप व पब बंद ठेवण्याचे आदेश यांच्याकडून देण्यात आले आहेत. याप्रकरणी, दुकानमालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायालयाने दुकानदारांच्या बाजुने निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयात मेसर्स इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने अॅड.विणा थडाणी व अॅड. विशाल थडाणी यांच्यामार्फत दोन स्वंतत्र याचिका केल्या होत्या. या याचिकांवर सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.
दरम्यान, मुंबईतील मतदान प्रक्रियेदरम्यान 20 मे च्या दोन दिवस आधीच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे, मुंबईत 3 दिवस दारु दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका विक्रेत्यांना बसल्याने 4 जून रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली. विशेष म्हणजे न्यायालयानेही ही याचिका दाखल करुन घेतली. त्यावर, आज निर्णय देताना 4 जून रोजी निकालानंतर दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
