पनवेल : सिडको महामंडळाने नूकतीच बामनडोंगरी येथील दूकानांसाठी ऑनलाईन बोलीपद्धतीने लिलाव आयोजित केला होता. या लिलावात घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात आहे.
लिलाव अंतिम टप्यात असताना सिडकोचे संकेतस्थळावर काहीच हालचाली होत नसल्याने गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त करत लिलावात काही काळंबेरं असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सिडको मंडळाने स्पष्टीकरण देऊन काही काळांसाठी तांत्रिक अडचणी असल्याने ही अडचण झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर गुंतवणूकदारांनी बामनडोंगरी येथील दूकानांचा लिलावाचा कार्यक्रम पुन्हा आयोजित करावा अशी मागणी समाजमाध्यमांवर केली आहे.
